नाशिकः राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा आज निकाल लागला असला तरी साऱ्या राज्याचे लक्ष नाशिक शिक्षक मतदार संघाकडे होते. त्यातच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून विजयी झालेल्या सत्यजित तांबे यांच्यामुळे नाशिकच्या जागेविषयी आता आणखी उत्सुकता लागली आहे. तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांच्या विरोधात लढलेल्या शुभांगी पाटील यांनी हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा झाला आहे असा गंभीर आरोप शुभांगी पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आता आणखी नाशिक मतदार संघाकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.
शुभांगी पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांनी ज्या पद्धतीने या निवडणुकीचे विश्लेषण केले आहे. त्यामध्ये सत्यजित तांबे यांच्यावर त्यांनी गंभीर टीका आणि आरोप केले आहे.
ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती असं म्हणत त्यांनी सत्यजित तांबे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. त्याचमुळे त्यांनी ही निवडणूक मी लढत नव्हती तर जनतेने हातात घेतली होती असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
शुभांगी पाटील यांनी हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याच बरोबर सत्यजित तांबे यांना राजकीय वारसा आहे.
त्यामुळे त्यांना ही निवडणूक लढवणे सोपे झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर आपल्याला कोणताही राजकीय वारसा नसतानाही मी ही निवडणूक लढली आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
या निकालात शुभांगी पाटील यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी म्हटले आहे की, आता माझी खरी लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे उद्यापासूनच माझी खरी लढाई सुरु करायची आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
शुभांगी पाटील यांनी या निवडणुकीमध्ये मी पराभूत झाले असले तरी आता आता मला शिक्षकांसाठी मोठे आंदोलन करायचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांची ही लढत असली तरी ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे काही जण म्हणत होते, मात्र या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना जनतेने घाम फोडला होता असा खोचक टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.
या निवडणुकीत मी पराभूत झाले असले तरी मला माझ्या जनतेचा कौल मान्य आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. आपण पहिल्यांचा उभा राहूनही मला यावेळी 35 हजार मतं पडली आहेत. त्यामुळे ही मतं विकली गेली नव्हती असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.