मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकले, तेव्हापासून राज्यात राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत असतानाच आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लहान मुलांचे वय बघून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्या प्रकल्पाविषयी चौकशी करण्याची मागणी केली होती. रस्ते प्रकल्पात घोटाळा असल्याचाही आरोप करण्यात आला होता.
त्यामुळे आता त्यावरून त्यांच्या जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या रस्त्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर देत त्यांचे आरोप बालिशपणाचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे आता रस्ते प्रकल्पावरून शिंदे आणि ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार असल्याचे दिसून येत आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, लहान मुलाला एखादी वस्तू मिळत नाही. तेव्हा ते आदळआपट करतात. लहान मुलांच वय बघून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, पण यांच्यातल्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर दिले पाहिजे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप हे नंतर महाराष्ट्रामधील जनतेच्या लक्षात येईल की हे किती बालिशपणाची आरोप आहेत असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर खोचकपणे टीका केली आहे.
रस्ते बांधायचे आणि पुढच्या वर्षी ते वाहून जायचे हा प्रकार ज्यांच्या काळात होता आणि खड्डे बुजवण्याचे पैसे ज्या कोणाच्या खिशात जात होते ते याच्या पुढे जाणार नाहीत याची पोटदुःखी निश्चितपणे होणे हे स्वाभाविक आहे असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
परंतु येत्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील मंगलमय कार्यक्रमामध्ये उत्तर देणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. आम्हाला कोणाचं मन दुखवायच नाही त्याचमुळे आम्ही सामनालादेखील जाहिराती दिल्या आहेत एवढं आमचं मन मोठं आहे असा खोचक टोला त्यांनी ठाकरे कुटुंबीयांना लगावला आहे.