सुट्टीनंतर ‘या’ दिवसांपासून शाळा होणार सुरू; विदर्भातील शाळांबाबत शासनाचा महत्वपूर्ण निर्णय…

शिक्षकांच्या अनुदानाच्या प्रश्नावरही त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याविषयी ते म्हणाले की, 20 मे पर्यंत सर्व त्रूटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यात येणार आहे.

सुट्टीनंतर 'या' दिवसांपासून शाळा होणार सुरू;  विदर्भातील शाळांबाबत शासनाचा महत्वपूर्ण निर्णय...
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 11:10 PM

मुंबई : राज्यातील शाळांविषयी अनेक मुद्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यातच आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्यातील शाळा यंदा 15 जून रोजी सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. तर विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने त्या ठिकाणी ३० जूनपासून शाळा होणार असलस्याचेही दीपक केसरकर यांनी दिली आहे. यावेळी दीपक केसरकर यांनी सांगितले की, राज्यातली शाळा 15 जून नंतर सुरू होणार असल्या तरी सुट्टीचे नियोजन विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना करता यावे यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही दीपक केसरकर यांनी दिली.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार. तसेच विद्यार्थ्यांसाठी उपयु्क्त ठरणारा केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमही राज्यात लागू केला जाणार आहे.

त्याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्याना होणार आहे.तसेच यापुढे सरकारी व महापालिका तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या मुलांच्या शाळेचे कपडे, वह्या, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

तसेच पाठ्यपुस्तकात प्रत्येक धड्यानंतर आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे, त्यामुळे त्याचाही फायदा मुलांच्या अभ्यासासाठी होणार असून सरकारतर्फे शासनाकडून विद्यार्थ्यांच्या फायद्याचे निर्णय घेतले गेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षकांच्या अनुदानाच्या प्रश्नावरही त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याविषयी ते म्हणाले की, 20 मे पर्यंत सर्व त्रूटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यात येणार आहे.

तसेच शिक्षक सेवकांच्या पगारातही वाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्याही शिष्यवृत्तीमध्येही वाढ करण्यात आल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.