AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशियातील पहिल्या रेल्वेचा इतिहास आता पन्नास रूपयांत पाहा, सीएसएमटीच्या हेरीटेज गॅलरीच्या तिकीटदर आणि वेळेत बदल

मध्य रेल्वेचे हेडक्वार्टर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही इमारत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ठ आहे. गॉथिक शैलीतील ही इमारत जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर हेरीटेज गॅलरी आहे.

आशियातील पहिल्या रेल्वेचा इतिहास आता पन्नास रूपयांत पाहा, सीएसएमटीच्या हेरीटेज गॅलरीच्या तिकीटदर आणि वेळेत बदल
GIPRImage Credit source: GIPR
| Updated on: Jan 27, 2023 | 6:31 PM
Share

मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या हेरीटेज गॅलरी पाहण्यासाठीच्या तिकीट दरात घसघशीत कपात केली आहे. तसेच ही गॅलरी पाहण्याची वेळही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ही हेरीटेज गॅलरी पाहण्यासाठी मुंबईकरांना अधिक वेळ मिळणार आहे. येत्या 30 जानेवारीपासून या हेरीटेज गॅलरीला पाहण्याची वेळ वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांसह मुंबईकरांचा फायदा होणार आहे.

CSMT

CSMT BUILDING  MODEL

मुंबईकरांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या हेरिटेज गॅलरीच्या वेळेत बदल करीत वेळेत वाढ करण्यात आली आहे. नव्या निर्णयानूसार हेरीटेज गॅलरी पाहण्यासाठी तिकीटाच्या काऊंटरची वेळ आता सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत करण्यात आली आहे. तर गॅलरी पाहाण्याची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 अशी बदल्यात आली आहे.

GIPR LOGO

GIPR LOGO

हेरीटेज गॅलरीच्या प्रवेशाचे तिकीट दरही कमी करण्यात आले असून आता प्रोढ व्यक्तींसाठी प्रत्येकी 50 रूपये तर विद्यार्थ्यांसाठी 20 रूपये तिकीट दर करण्यात आला आहे. याआधी प्रोढांसाठी 200 रू. तर विद्यार्थ्यांसाठी 100 रूपये तिकीट दर होते. कोविड काळाआधी या गॅलरीला दररोज 10 जण तर 22 ऑक्टोबर ते आतापर्यंत दररोज सरासरी 12 जणांनी भेट दिली आहे. 13 मार्च 2020 रोजी कोविड साथीमुळे गॅलरीला बंद ठेवण्यात आले, नंतर 17 ऑक्टोबर 2022 पासून हे हेरीटेज संग्रहालय पुन्हा सुरू करण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सूतार यांनी स्पष्ट केले.

'teapot'.

‘teapot’.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त हेरिटेज गॅलरीला भेट दिली देत हेरिटेज गॅलरीत ठेवलेल्या ऐतिहासिक वस्तू आणि कलाकृतींचे कौतुक केले. इतिहास प्रेमीं हितासाठी हेरिटेज गॅलरीचा प्रसार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या हेरीटेज इमारतीतील गॅलरीत अनेक ऐतिहासिक दस्ताऐवज तसेच ब्रिटीशकालीन वस्तूंचे जतन करण्यात आले आहे.

HERITAGEgallery-9

CSMT HERITAGE gallery

या म्युझियममध्ये भारतीय रेल्वेच्या बोरीबंदर ते ठाणे या पहिल्या प्रवासाचे तसेच ब्रिटीशांनी रेल्वे मार्ग उभारणी स्थापन केलेल्या ग्रेट इंडीयन पेनिनसुला रेल्वे कंपनी ( GIPR)  स्थापना करण्यासाठी लंडनच्या संसदेत झालेले ठरावाची प्रत, तसेच माथेरानच्या नॅरोगेज रेल्वे मार्गांसह अनेक दस्ताऐवज आणि अनेक पुरातन वस्तूंचे जतन केले आहे.

gallery-1

gallery-1

नवे तिकीट दर 

प्रोढांसाठी – 50 रूपये

विद्यार्थ्यांसाठी  – 20 रूपये

तिकीट खिडकीची नवीन वेळ

सकाळी 11 ते दुपारी 4 ( पहाण्याची वेळ स.11 ते सायं. 5 )

gallery-10

gallery-10

या इमारतीच्या तळमजल्यावरील हेरीटेज गॅलरीत बोरीबंदर ते ठाणे 16 एप्रिल 1853 रोजी धावलेल्या पहील्या झुकझुक गाडीचा इतिहास जतन करण्यात आला आहे. हा ऐतिहासिक ठेव्याचा आनंद रेल्वेप्रेमी तसेच विद्यार्थ्यांना अवघ्या पन्नास ते वीस रूपयांच घेता येणार आहे.

firefighting steam pump from london

firefighting steam pump from london

गेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेची ( GIPR) स्थापना 1 ऑगस्ट 1849 रोजी ब्रिटिश संसदेत कायदा पास करून करण्यात आली होती, या कंपनीचे भाग भांडवल £50,000 पाऊंड होते. 17 ऑगस्ट 1849 रोजी, मुंबईला खान्देश, बेरार आणि इतर प्रेसिडेन्सीशी जोडण्यासाठी 56 किमी लांबीची प्रायोगिक लाईन, ट्रंक लाईन बांधण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीशी औपचारिक करार केला. ,या उद्देशासाठी, ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक न्यायालयाने जेम्स जे. बर्कले यांची मुख्य निवासी अभियंता म्हणून नियुक्ती केली आणि त्यांचे सहाय्यक सीबी कार आणि आरडब्ल्यू ग्रॅहम होते. त्याचे व्यवस्थापन 1 जुलै 1925 रोजी सरकारने ताब्यात घेतले. 5 नोव्हेंबर 1951 रोजी मध्य रेल्वे म्हणून त्याचा समावेश करण्यात आला.

gallery-7

gallery-7

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.