Seema Haider : सचिन-सीमाला 1 लाख पगार देणार, सिनेमात कामाची ऑफर, यूट्यूबसाठीही ऑफर, याला म्हणतात लॉटरी
Seema Haider : मूळची पाकिस्तानधील कराचीमधील असलेली सीमा प्रेमिका नाहीतर गुप्तहेर असल्याचा संशय व्यक्त केला गेला. त्यामुळे UP ATS ने सीमासह घरातील सर्वांचीच चौकशी केली मात्र अद्याप काही समोर आलं नाही. अशातच सीमा आणि तिचा पती सचिनसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
मुंबई : सीमा हैदर प्रकरणाची देशातच नाहीतर जगभरातही चर्चा झालीये. प्रेमासाठी पाकिस्तान सोडणाऱ्या सीमा हैदरला अनेक परीक्षा द्याव्या लागल्या आहेत. आधी तिने मायदेशातून पलायन केलं आणि भारतामध्ये येण्यासाठी छुप्या पद्धतीचा अवलंब केला. सीमा आणि तिचा प्रियकर सचिन दोघांची प्रेम कहानी देशातील घराघरात पोहोचली. मूळची पाकिस्तानधील कराचीमधील असलेली सीमा प्रेमिका नाहीतर गुप्तहेर असल्याचा संशय व्यक्त केला गेला. त्यामुळे UP ATS ने सीमासह घरातील सर्वांचीच चौकशी केली मात्र अद्याप काही समोर आलं नाही. सीमा आणि सचिन दोघे आर्थित संकटात असल्याची माहिती प्रसार माध्यमांमधून समोर आली होती. अशातच सीमा आणि तिचा पती सचिनसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
नेमकं काय झालंय?
ग्रेटर ग्रेटर नोएडातील रबुपूर गावात पोस्टमनने सीमा आणि सचिनच्या घरी पत्र दिलं. मात्र तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना ते खोलू दिलं नाही. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या आदेशानंतर पत्र उघडल्यावर दोघांनाही लॉटरी लागल्यासारखं आहे.
गुजरातमधील एका व्यावसियकाने दोघा नवरा-बायकोला नोकरी ऑफर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघांनाही 50 हजार रूपये पगार मिळणार आहे. जेव्हारपासून सीमा आणि सचिनचं प्रेम प्रकरण समोर आलं तेव्हापासून चौकशांंच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे घरातील कमावता सचिनही या प्रकरणामध्ये गुंतला आहे. गुजरातमध्ये येऊन केव्हाही नोकरीवर रुजू होऊ शकता, असं पत्रामध्ये म्हटलं आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अमित जानी यांनी थेट सीमाला आपल्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी ऑफर दिली आहे. सीमाच्या घरी जाऊन त्यांनी चेक दिला होता. मात्र सीमा-सचिनच्या घरच्यांनी आता चौकशी चालू असल्याने अशी कोणतीही ऑफर काही घेता येणार सांगितलं.
सीमा आण सचिन यांना त्यांच्या प्रेम प्रचकरणामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. लोकांना जाणून घ्यायचं आहे की, सीमा खरंच आपल्या प्रेमासाठी आली की ती एजेंट आहे? याबाबत लोकांना फार उत्सुकता आहे. त्यामुळे दोघांच्या चॅनेलला अनेकांनी फॉलो केलं असून यू-ट्यूबवरही दोघे व्हिडीओ टाकत आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या चॅनेलचे सस्क्राईबर्स मोठ्या संख्येने वाढताना दिसत आहेत. याचा त्यांना फायदा असा की इथूनही त्यांना पैसे भेटत आहेत.
दरम्यान, आता एका मुलाखतीमध्ये सीमाने सांगितलं की, मी माझं इन्स्टा अकाऊंट हे प्राईव्हेट ठेवलं होतं. पण मला जेव्हा समजंल की काही लोक त्यांचे व्हिडीओ घेऊन दुसरीकडे शेअर करून पैसे कमवत आहेत. तेव्हा मी अकाऊंट पब्लिक केलं जेणेकरून लोक मला फॉलो करू शकतील. या व्हिडीओमधून पैसे मिळतात जेणेकरून कुटूंबालाही आर्थिक हातभार लागतो.