सहा वर्षे ‘त्या’ आरोपाखाली तुरुंगवास भोगला, पण ती? ती… जिवंत आहे, दोनदा दिसली

त्या आरोपाखाली मी सहा वर्षे तुरुंगवास भोगला. पण, ती जिवंत आहे. एकदा नव्हे तर ती दोनदा दिसली, आताही गुवाहाटीमध्ये दिसली. मात्र, तिच्यावर कुणाचा तरी दबाव आहे.

सहा वर्षे 'त्या' आरोपाखाली तुरुंगवास भोगला, पण ती? ती... जिवंत आहे, दोनदा दिसली
SHEENA BORA
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 6:20 PM

मुंबई । 12 ऑगस्ट 2023 : शीना बोरा हत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. आपल्याच मुलीची हत्या केल्याच्या आरोपावरून इंद्राणी मुखर्जी हिला मुंबई पोलिसांनी 25 ऑगस्ट 2015 रोजी अटक केली होती. शीना हत्या प्रकरणात सहा वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगल्यानंतर 18 मे 2022 रोजी इंद्राणी जामिनावर बाहेर आली. सर्वोच्च न्यायालयाने मुखर्जी यांना जामीन मंजूर केला होता. इंद्राणी मुखर्जी यांनी तिच्या ‘अनब्रोकन: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात शीना बोरा जिवंत असल्याचे म्हटले आहे. इंद्राणीने या पुस्तकात मुलगी शीना हिच्यासोबत आपले नाते खूप खास होते. आम्ही दोघी सारख्याच दिसत होतो. आम्हाला सारखेच पदार्थ आवडायचे. आमच्यात आई मुलीचे नाते नव्हे तर मैत्रीचे नाते होते, असे म्हटले आहे.

इंद्राणीने म्हणते, ती तिचे कपडे आणि दागिने शीनासोबत शेअर करत असे. मला 21 वर्षांच्या मुलीचे पालनपोषण करण्याचे आव्हाने नव्हते. कारण, ती माझी मैत्रिण होती. मी शांत राहण्याची माझी भूमिका बदलली तेव्हा परिस्थिती बदलली. पण, मी कधीही शीनासमोर राग व्यक्त केला नाही, असा दावाही मुखर्जी यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

शीनावर नेहमीच विश्वास ठेवला

माझा शीनावर विश्वास आहे. “शीना माझी मुलगी होती. जी काहीही चुकीचे करू शकत नाही. तिच्या निर्णयांचा आदर केला. परंतु तिने संपर्क न ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हाही मी तिच्या निर्णयाचा आदर केला. तिची बदनामी करून आम्हाला अन्य काहीही मिळवायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शीना जिवंत आहे

मी तुरुंगात असताना भायखळा तुरुंगातील एका कैद्याने शीनाला काश्मीरमध्ये पाहिल्याचा दावा केला होता. त्या कैद्याने पाहिलेली ती महिला एक सरकारी अधिकारी होती. मी माझ्या वकील सना (रईस खान) मार्फत सीबीआयला याची चौकशी करण्याची विनंती केली. विशेष सीबीआय न्यायाधीश एसपी नाईक निंबाळकर यांनी एअरपोर्ट ऑथिरीटीला गुवाहाटी विमानतळाच्या बोर्डिंग गेटजवळ 5 जानेवारी रोजी पहाटे 5.30 ते 6 या वेळेतील फुटेज देण्याचे निर्देश दिले आहेत. मला वाटते की शीना जिवंत आहे आणि ती बाहेर आहे, असेही इंद्राणीने लिहिले आहे.

शीना दुसऱ्यांदा गुवाहाटी विमानतळावर दिसली

“शीनाचे काय? माझ्याच मुलीचा गळा दाबल्याचा आरोप माझ्यावर आहे. शीना आणि माझा आत्मा एक आहे. आम्हाला समान वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. माझी वकील मैत्रिण सविना हिने शीनाला गुवाहाटी विमानतळावर पाहिले. आम्हाला विमानतळावरून शीनाचे फुटेज मिळाले. मी तुरूंगातुन बाहेर आल्यानंतर ही माहिती एैकून माझ्यात काही बदल झाला. जिच्या हत्येचा आरोप आहे ती व्यक्ती तुरुंगात सडत असताना जिची हत्या झाली ती बाहेर जिवंत आहे. ती समोर का आली नाही हे मला माहीत नाही. तिच्यावर काही तरी दबाव आहे म्हणूनच ती समोर येत नाही अशी मला खात्री आहे. शीना जिवंत असल्याचे मला दुसऱ्यांदा सांगण्यात आले असेही त्या म्हणाल्या.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.