“हे सरकार किती असंवेदनशील आहे हे या उदाहरणावरून दिसतं”; काँग्रेसनं सरकारला असंवेदनशील का ठरवलं…
अभ्यासक्रमाबाबत असलेल्या त्यांच्या मागण्यांकडे सरकारने याआधीच लक्ष दिले असते तर विद्यार्थ्यांना हे आंदोलन करावे लागले नसते असा टोलाही त्यानी सरकारला लगावला आहे.
मुंबईः पुण्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आयोगाने बदल सुचवला आहे. त्यामुळे एमपीएससी विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे मात्र त्याच वेळी त्यांनी राज्य सरकारलाही असंवेदनशील ठरवले आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासाठी जर आंदोल करावे लागत असेल. सरकार त्यांच्याकडे चार चा दिवस लक्ष देत नसेल तर हे सरकार किती असंवेदनशीर आहे हेच यामधून दिसून येते. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करायला हवा असा सल्ला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
अभ्यासक्रमाबाबत असलेल्या त्यांच्या मागण्यांकडे सरकारने याआधीच लक्ष दिले असते तर विद्यार्थ्यांना हे आंदोलन करावे लागले नसते असा टोलाही त्यानी सरकारला लगावला आहे.
अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी जर संघर्ष आणि लढा उभा करावा लागत असेल तर हे सरकार विद्यार्थ्यांबाबत किती असंवेदनशील आहे हेच यातून ठळकपणे दिसून येते असंही त्यांनी यावेळी सांगितले.
बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांच्या या उभा केलेल्या संघर्षाला आणि लढ्याला शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदनही केले आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारने याआधीच विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायले पाहिजे होते अशी टीका त्यांनी सरकार आणि आयोगावर केली आहे. सरकारनेही विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन त्या तात्काळ सोडवणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.