राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांची निर्दोष सुटका
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या टिप्पणीनंतर त्यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र अखेर जावेद अख्तर यांना याप्रकरणात दिलासा मिळाला आहे.
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या टिप्पणीनंतर त्यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र अखेर जावेद अख्तर यांना याप्रकरणात दिलासा मिळाला आहे. जावेद अख्तर यांच्याविरोधातील मानहानीची तक्रार मागे घेण्यात आली आहे. दोघांनी प्रकरण सामंजस्यानं मिटवल्यानं लुंड दंडाधिकाऱ्यांनी अख्तर यांची या खटल्यातून निर्दोष सुटका केली. त्यामुळे जावेद अख्तर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण ?
2021 मध्ये याप्रकरणी एका वकिलाने मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रार दाखल केली होती. तालिबानमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर संपूर्ण जगभरामधून प्रतिक्रिया उमटत होत्या. यादरम्यान जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला होता. त्यावेळी त्यांनी तालिबान आणि आरएसएसची तुलना केली होती. तालीबानी आणि आरएसएस एकसमान आहेत अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं, मात्र त्यांच्या या विधानामुळे प्रचंड गदारोळ माजला, खळबळही माजली.
जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यानंतर ॲडव्होकेट संतोष दुबे यांनी मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयात अख्तर यांच्याविरोधात कलम 499(मानहानी), 500(बदनामी अंतर्गत शिक्षा) फौजदारी तक्रार दाखल केली होती.
मात्र काही दिवसांपूर्वी तक्रारदार व्यक्तीने अख्तर यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज केला होता. दोन्ही पक्षकारांनी परस्पर सहमतीने न्यायालयाबाहेर प्रकरण मिटवले असून यापुढे अख्तर यांच्याविरोधात खटला चालवू इच्छित नाही, असे तक्रारदाराने नमूद केलं. त्यानंतर मुलुंड न्यायदंडाधिकारी एस. डी. चक्कर यांनी जावेद अख्तर यांनी निर्दोष सुटका केली. त्यामुळे ज्येष्ठ गीतकार, लेखक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जावेद अख्तर यांचं वक्तव्य काय ?
प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. तसेच, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले होते. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संभाषण करताना अख्तर म्हणाले की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमा देखील ओलांडतील.
एनडीटीव्हीशी संभाषण करताना जावेद अख्तर, ज्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता ताब्यात घेण्यास नाखूष असलेल्या भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गावर टीका केली होती. ते म्हणाले की, राईट विंग जगात एक आहे. भारतातील अल्पसंख्यांकांच्या मॉब लिंचिंगच्या काही घटनांवर अख्तर म्हणाले, ‘पूर्ण तालिबान बनण्याची ही एक प्रकारची पूर्ण ड्रेस रिहर्सल आहे. ते तालिबानी युक्तीचा अवलंब करत आहेत. ते एकच लोक आहेत, फक्त नाव वेगळे आहे. भारतीय राज्यघटना त्यांचे ध्येय आणि त्यांच्यामध्ये येत आहे, परंतु जर संधी दिली तर ते ही सीमा ओलांडतील.’
‘मला वाटते जे आरएसएस, विहिंप, बजरंग दल यासारख्या संघटनांना समर्थन देतात, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तालिबान अर्थातच मध्ययुगीन मानसिकता आहेत, यात शंका नाही, ते रानटी आहेत पण तुम्ही समर्थन देत असलेल्यांपेक्षा ते वेगळे कुठे आहेत? त्यांची बाजू मजबूत होत आहे आणि ते त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहेत. त्यांची मानसिकता सारखीच आहे’ असे त्यांनी म्हटलं होतं.