50 महिलांची छेड काढणारा गुन्ह्यानंतर घर का बदलत होता?

पन्नासपेक्षा जास्त महिलांचा विनयभंग केलेल्या एका सिरिअल मोलेस्टरला मुंबई पोलिसांनी अखेर अटक केली.

50 महिलांची छेड काढणारा गुन्ह्यानंतर घर का बदलत होता?
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 2:24 PM

मुंबई : पन्नासपेक्षा जास्त महिलांचा विनयभंग केलेल्या एका सिरिअल मोलेस्टरला (Serial Molester Who Molest 50 Women) दिंडोशी पोलिसांनी (Dindoshi Police) अखेर अटक केली. या नराधमाने 2011 पासून ते आतापर्यंत अनेक महिलांचा विनयभंग केला आहे. त्याला आतापर्यंत 12 प्रकरणांमध्ये अटकही झाली आहे. तो अनेक पोलीस ठाण्यांमध्ये मोस्ट वॉण्टेड यादीत होता (Serial Molester Who Molest 50 Women).

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबरला दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकी स्वाराने 24 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मिठी मारली होती. त्यानंतर तिच्याशी गैरवर्तन केलं आणि तेथून फरार झाला. यानंतर महिलेने दिंडोशी पोलिसांत दाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर या आरोपीला पकडण्यासाठी एक विशेष पोलीस पथक नेमण्यात आलं. सर्वात आधी या पथकाने सर्व सीसीटीव्हीची पाहणी सुरु केली. 2017 मध्येही पवईत असाच एक गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्या गुन्ह्यातील आरोपीची सर्व माहिती पवई पोलीस स्टेशनमधून घेऊन दिंडोशी पोलीस आरोपी कल्पेश देवधरच्या घरी पोहोचले आणि त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली.

50 महिलांचा विनयभंग

मुंबईच्या मालाड पूर्वमध्ये दिंडोशी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या 30 वर्षीय सिरीयल मॉलेस्टरच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. वर्ष 2011 मध्ये या आरोपीला एका महिलेसमोर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि नंतर तो जामिनावर सुटला होता. मात्र, झालेल्या शिक्षेपासून त्याने काहीच धडा घेतला नाही. या नराधमाने जवळपास 50 महिलांचा विनयभंग केला. पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये त्यानेच ही कबुली दिली आहे (Serial Molester Who Molest 50 Women).

अनेक पोलीस ठाण्यांमध्ये विनयभंग आणि अपहरणाचे 12 गुन्हे, वारंवार घरंही बदलायचा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कल्पेश देवकर हा ड्रायव्हर असून चारकोप येथील राहणार आहे. एखादा गुन्हा केल्यानंतर कल्पेश वारंवार आपला पत्ता बदलायचा. मुंबईमध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये कल्पेश्ववर विनयभंग, अपहरण असे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. ज्यात त्याला अटकही झाली. तर असेही काही गुन्हे आहेत ज्यामध्ये कल्पेश देवधर हा वॉण्टेड आहे. 13 जुलै 2017 मध्ये कल्पेश देवधर पवई हिरानंदानी येथे तीन कॉलेजच्या विद्यार्थीनींसमोर अश्लील चाळे करुन फरार झाला होता.

कल्पेश देवधर आपल्या आई आणि तीन बहिणींसोबत मालाड येथे राहायला होता. मात्र, कल्पेशच्या या सवयीमुळे आणि वारंवार गुन्हा करण्याच्या प्रवृत्तीमुळे कुटुंबातले लोक त्याच्यापासून दूर राहू लागले. देवधरवर विनयभंग मारामारी किडनॅपिंग आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. मिळाल्या माहिती प्रमाणे, त्याने आतापर्यंत सुमारे 50 महिलांचा विनयभंग केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. मात्र, बहुतांश प्रकरणांमध्ये पीडित महिलांकडून तक्रार करण्यात आलेली नाही. म्हणून जर कोणीही या आरोपिकडून पीडित असेल तर त्यांनी पोलिसांत येऊन तक्रार करावी, अंस आवाहन पोलिसांकडून करण्यात आला आहे.

Serial Molester Who Molest 50 Women

संबंधित बातम्या :

Black magic against Minister : एकनाथ शिंदेंविरोधात जादूटोणा, मोठं राजकीय षडयंत्र?

हुंडा न दिल्याने लग्न मोडलं, मुलगीही घरातून गायब; उद्विग्न बापाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक, विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शिक्षकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.