Eknath Khadse Bail | एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा, भोसरी जमीन खरेदी प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर

माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

Eknath Khadse Bail | एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा, भोसरी जमीन खरेदी प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर
एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 4:29 PM

मुंबई : माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पुणे येथील भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसे हे आरोपी आहेत. याच प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.

मंदाकिनी खडसे यांनादेखील दिलासा

यापूर्वी न्यायालयाकडून मंदाकिनी खडसे यांनादेखील दिलासा मिळालेला आहे. मंदाकिनी खडसे यांची 19 ऑक्टोबर रोजी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. पुण्यातील भोसरी जमीन कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने मंदाकिनी खडसेंना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

खडसे यांच्या नातेवाईकांना भूखंड विकण्यात आला

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहित केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसान भरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.

शस्त्रक्रिया झाल्यामुळे खडसे उपस्थित राहू शकले नव्हते

दरम्यान, एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन खरेदी प्रकरणात 17 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.  परंतु शस्त्रक्रिया झाल्यामुळे खडसे उपस्थित राहू शकले नव्हते. कोर्टात हजर राहण्यासाठी  त्यांचा स्वास्थ्याच्या कारणावरून अतिरिक्त वेळ मागील सुनावणीत मागितला गेला होता. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

प्रभाकर साईलला पोलिस संरक्षण, सर्व पुरावे क्राईम ब्रँचकडे; समीर वानखेडेंवर मुंबई पोलिस कारवाई करणार?

China Covid Updates: धोका वाढला! चीनमधील ‘या’ पर्यटनस्थळावर बंदी

दीडशहाण्या बाबाचे 14 महिन्यांच्या बाळावर घरीच चुकीचे उपचार; मुलीचा मृत्यू अन् कसाई बापाला बेड्या!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.