Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING | मुंबई उच्च न्यायालयाची अचानक लिफ्ट बंद पडली, सात जण अडकले, प्रचंड धावपळ, अखेर…

मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत आज लिफ्ट बंद पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं.

BREAKING | मुंबई उच्च न्यायालयाची अचानक लिफ्ट बंद पडली, सात जण अडकले, प्रचंड धावपळ, अखेर...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 5:43 PM

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात अनेक मोठमोठ्या प्रकरणांचा न्यायनिवाडा केला जातो. मुंबई उच्च न्यायालयाबद्दल महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आदराची भावना आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा परिसर आणि इमारतही आकर्षित आहे. अनेकजण मुंबईत येतात तेव्हा लांबून किंवा बाहेरुन मुंबई उच्च न्यायालय जरुर पाहतात. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयात नोकरी मिळावी यासाठी अनेक तरुण प्रयत्न करत असतात. तर अनेकजण आपल्या वेगवेगळ्या समस्या, तक्रार आणि न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयाची पायरी चढत असतात. अशा महत्त्वपूर्ण मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत आज अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत आज लिफ्ट बंद पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ही लिफ्ट बंद पडली. या लिफ्टमध्ये तब्बल सात जण होते. यामध्ये 6 पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. संबंधित घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिथे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं.

सात जणांना वाचवण्यात यश

अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे अडकलेल्या सर्व सातही जणांना बाहेर काढण्यात यश आलं. लिफ्ट उघडल्यानंतर अडकलेल्या सातही जणांनी सुटकेचा श्वास सोडला. सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. कुणालाही कोणताही त्रास होत नसल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी लिफ्ट कंपनीचे अधिकारी देखील दाखल झाले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या संकुलात अशाप्रकारची घटना घडली असल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई उच्च न्यायालय हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. अशा ठिकाणी लिफ्टची वेळोवेळी पाहणी केली जात नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. इतक्या महत्त्वपूर्ण ठिकाणी अशा प्रकारची घटना कशी घडू शकते? असा प्रश्न उपस्थित होतोय. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. पण संबंधित घटना धोकादायक होती. या प्रकरणी काही चौकशी होते का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.