Shahaji Bapu Patil : मुका घ्या, मुका…फेमस बापुंना थेट कार्यकर्त्याची पप्पी, इंटरनेटवर शाहजीबापू पुन्हा फार्मात

पण आता हेच बापू पुन्हा एकदा वायरल व्हायला लागलेत. आणि त्याला कारण ठरलंय त्यांचा एक कार्यकर्ता, कार्यकर्त्यांना बापूंना बघितलं आणि थेट पप्पी घेतली. हा फोटो आता सोशल मीडियावर वाऱ्यासरखा फिरतोय. 

Shahaji Bapu Patil : मुका घ्या, मुका...फेमस बापुंना थेट कार्यकर्त्याची पप्पी, इंटरनेटवर शाहजीबापू पुन्हा फार्मात
फेमस बापुंना थेट कार्यकर्त्याची पप्पीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 7:44 PM

मुंबई : गेला काही दिवसात एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचा झालेला बंड, महाराष्ट्रात कोळसळलेलं सरकार, तयार झालेलं नव सरकार, हा सर्व प्रकार देशभर चर्चेत तर आहे. मात्र या बंडातले आमदार त्याहूनही (Shahaji Bapu Patil) जास्त चर्चेत आहेत. आपल्या कार्यकर्त्याशी बोलताना फोनवरून सहज मारलेल्या डायलॉगनं (Kay Zadi Kay Dongar Kay Hotel) सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील वर्ल्ड फेमस झाले. काय डोंगूर, काय झाडी काय हॉटेल, हे बापूंचं रांगडेपण नेटकरेंना भरभरून भावलं. त्यामुळेच बापूंवर अनेक गाणी रचली गेली, मीम्स बनल्या नुसता नेटकरेंच्या क्रिएटिव्हिटीचा महापूर आला. पण आता हेच बापू पुन्हा एकदा वायरल व्हायला लागलेत. आणि त्याला कारण ठरलंय त्यांचा एक कार्यकर्ता, कार्यकर्त्यांना बापूंना बघितलं आणि थेट पप्पी घेतली. हा फोटो आता सोशल मीडियावर वाऱ्यासरखा फिरतोय.

कार्यकर्त्यांचं प्रेम पाहा

नेमकं काय घडलं?

आपल्या कार्यकर्त्याचं आपल्या नेत्यावर प्रेम असावं अशी अपेक्षा प्रत्येकच नेत्याला असते. त्यातून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते तयार झाले आणि तेच पुढे मोठे राजकारणी झाले. बापूंचाही असाच एक जबरा फॅन आज बापूंना भेटला. बापू आता इंटरनेटवर गेल्या काही दिवसात जाळ अन् धूर संगटच काढत आहेत म्हणल्यावर या कार्यकर्त्याला बापूंना पाहून तेवढं आप्रुप तर वाटणारच. या कार्यकर्त्यानं बापूंना बघितलं तसं जाऊन कडाडून मिठी मारली. या कार्यकर्त्यांना बापूंच्या डायलॉगची एवढी भुरळ पडलीय की कार्यकर्ता स्वतःच्या भावना आवरू शकला नाही, मुंबईमध्ये एका कार्यकर्त्यानं बापूंचा चक्क मुकाच घेऊन टाकला. राजू ओसवाल असं या कार्यकर्त्याचं नाव असून तो पुण्यातला एक उद्योजक असल्याची माहिती समोर आली.

नेटकऱ्यांच्या क्रिएटिव्हिटीला धुमारे

आता एवढा भन्नाट प्रकार आणि एवढा भन्नाट नजरा बघितल्यावर पुन्हा नेटकरेंच्या क्रिएटिव्हिटीला धुमारे फुटले. नेटकर यांनी थेट दादा कोंडकेंच्या मुका घ्या मुका चित्रपटातले कॅप्शन देऊन बापूला सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल करायला सुरू केली. पावसाळ्यात जेवढा पाऊस बरसला नसेल तेवढ्या या फोटोवरती कमेंट आणि लाईक लाईकचा पाऊस पडायला लागलाय. त्यामुळे मागे एका डायलॉगनं चर्चेत आलेले बापू इंटरनेटच्या मार्केटमध्ये पुन्हा फार्मात आलेत. असा प्रकार घडणं म्हणजे नेटकऱ्यांसाठी ही आयती मेजवाजवानीच आहे. त्यामुळे आता यावरही हजारो मीम्स बनू लागले आहेत. त्यामुळे शाहाजी बापु पाटीलही कायम ट्रेंडिंगमध्ये आहेत.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.