Shambhuraj Desai : बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा कोणी केली, मी त्यांना गद्दार म्हणणार नाही कारण ते ठाकरे आहेत; शंभूराज देसाईंचा टोला

विरोधी पक्षांचे काम आहे विरोध करायचे. मात्र जनतेची कामे ही कुठेही थांबली नाहीत, थांबणारही नाहीत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 18-18 तास काम करत आहेत, असे शंभूराज देसाई म्हणाले.

Shambhuraj Desai : बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा कोणी केली, मी त्यांना गद्दार म्हणणार नाही कारण ते ठाकरे आहेत; शंभूराज देसाईंचा टोला
शंभूराज देसाईImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 6:32 PM

मुंबई : बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा कोणी केली, असा सवाल करत मी त्यांना गद्दार म्हणणार नाही. कारण ते ठाकरे आहेत, असा टोला शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. टीव्ही 9सोबत संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पहिल्यांदाच आमदार झालेले आम्हाला गद्दार बोलतात. आम्ही जनतेतून चार-चार वेळा निवडून आलो आहोत, अशी टीका आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर केली. आम्ही आदित्य ठाकरेंची भाषणे ऐकतो. त्यात ते आम्हाला गद्दार म्हणतात. लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या, असे आव्हान देतात. आदित्य ठाकरेंसारख्या युवा नेत्याकडून अशाप्रकारची भाषा शोभत नाही, असे ते म्हणाले. तर शिवसेना (Shivsena) प्रमुखांनी कधीही स्वत: ला पद घेतले नाही. हे मात्र एका घरात दोन-दोन पदे स्वत: मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री, अशी टीका त्यांनी केली. हे बाळासाहेबांनी कधीच केले नाही, असेही ते म्हणाले.

‘कामे कुठेही थांबलेली नाहीत’

विरोधी पक्षांचे काम आहे विरोध करायचे. मात्र जनतेची कामे ही कुठेही थांबली नाहीत, थांबणारही नाहीत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 18-18 तास काम करत आहेत. या महिन्याभरात कॅबिनेटच्या पाच ते सहा बैठका झाल्या. महत्त्वाचे निर्णय झाले. गडचिरोलीला पूर आला तेव्हा दोघेही जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले. तिथे पाहणी केली, पंचनामे करण्याचे आदेश दिले. सोबतच वर्धा, यवतमाळ याठिकाणी गेले. तर आजही मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत. कामे कुठेही थांबलेली नाहीत. राज्याच्या सर्व सचिवांची भेट घेत राज्य सरकारच्या 100 दिवसांतील कामाबाबत चर्चा केली. राज्यासमोरचे जे प्रश्न आहेत, त्यावर काम केले जात आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले.

‘अडीच वर्षांपासून हेच सांगत होतो’

जे आम्ही आधी सांगत होतो, ते आता सगळे व्हायला लागले आहे. सहज कोणालाही मातोश्रीत आता प्रवेश मिळत आहे. याआधी वेळ घेतल्याशिवाय मंत्री, आमदारांना प्रवेश मिळत नव्हता. तुम्ही आजारी होतात, तेव्हा शिंदेंना अधिकार द्यायला हवे होते. आदित्य ठाकरे हेदेखील आता दौरे काढत आहे. आम्ही अडीच वर्षांपासून हेच सांगत होतो. उद्धव ठाकरे आजारी असताना कारभार एकनाथ शिंदेंच्या हाती द्यायला हवा होता. मात्र सर्व यंत्रणा केंद्रीत झाली होती. त्यामुळेच आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले शंभूराज देसाई?

संजय राऊत यांच्यावरही टीका

संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली. प्रत्येक वेळी काही ना काही कारण काढून कोर्टात जाणे सुरू आहे. रोज सकाळी उठले की संजय राऊत बडबडतात, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.