शरद पवार ब्रीच कँडीत ॲडमिट, तीन दिवस उपचार घेणार; सर्व कार्यक्रम रद्द
शरद पवार आजपासून तीन दिवस रुग्णालयात दाखल होणार असल्याने या तीन दिवसातील त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
मुंबई: राष्ट्रवादीचे (ncp) सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) हे ब्रीच कँडी रुग्णालयात (breach candy hospital) ॲडमिट झाले आहेत. पुढील तीन दिवस ते ब्रीच कँडीत उपचार घेणार आहेत. 2 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या प्रकृतीविषयीची माहिती देण्यात आली आहे. शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवार पुढील तीन दिवस रुग्णालयात उपचार घेणार आहेत. ते ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतील. येत्या 2 नोव्हेंबर रोजी त्यांना संध्याकाळी डिस्चार्ज मिळेल, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी पवार शिर्डीत येणार आहेत. तसेच पक्षाच्या 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबीराला ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे.
दरम्यान, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असं आवाहनही पक्षाकडून करण्यात आलं आहे,
मात्र, शरद पवार यांना नेमकं काय झालं? याची माहिती राष्ट्रवादीने दिली नाही. त्यामुळे पवार ब्रीच कँडीत नेमका कशावर उपचार घेणार हे समजू शकले नाही.
शरद पवार आजपासून तीन दिवस रुग्णालयात दाखल होणार असल्याने या तीन दिवसातील त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच ते या तीन दिवसात कुटुंबा व्यतिरिक्त कुणालाही भेटणार नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं.