महाराष्ट्रात ‘सुटकेस पॉलिटिक्स’…; बॅग चेकिंगवरून आरोप-प्रत्यारोप, अजित पवारांची प्रतिक्रिया चर्चेत

Ajit Pawar on Uddhav Thackeray Bag Check : राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. अशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. असं असताना महाराष्ट्रात 'सुटकेस पॉलिटिक्स' सुरु झालं आहे. यावर अजित पवारांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. वाचा...

महाराष्ट्रात 'सुटकेस पॉलिटिक्स'...; बॅग चेकिंगवरून आरोप-प्रत्यारोप, अजित पवारांची प्रतिक्रिया चर्चेत
अजित पवार, उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 12:40 PM

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. यंदाच्या या निवडणुकीत वेगवेगळे मुद्दे चर्चेत आले आहेत. बॅग चेकिंगच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची सभा झाली. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सभेला गेले होते. यावेळी हेलिपॅडवर उतरताच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅग तपासण्यात आल्या. यामुळे उद्धव ठाकरे संतापले. या बॅग चेकिंगचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तसंच भाषणातही या मुद्द्यावरून महायुतीवर निशाणा साधला. या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासण्याचा व्हीडिओ शेअर केला. त्यानंतर यावरून राजकारण तापलं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा माझ्या पण बॅगा तपासल्या आहेत. मी परभणीला असताना माझ्या बॅगा तपासल्या होत्या. निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार बॅगा तपासाचा आहे. लोकसभेला मुख्यमंत्र्याच्या बॅगा पण तपासल्या होत्या. आमच्यासोबत पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासल्या पाहिजेत, असं अजित पवार म्हणालेत.

शरद पवारांची प्रतिक्रिया

शरद पवार यांनी देखील बॅग तपासण्यावरून नाराजी व्यक्त केली. सत्तेचा वापर कसा करायचा आणि विरोधकांना त्रास देणे त्यांनी ठरवलेला आहे. सत्ताधाऱ्यांचे एकंदरीत हाच दृष्टिकोन आहे त्यामुळे हे सहन करावा लागेल. त्याबद्दलची नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे. विरोधकांना अशा पद्धतीची वर्तणूक दिली जाते. याचा काय निवडणूक फार मोठा परिणाम होईल असा काही नाहीये, असं शरद पवार म्हणालेत.

अमोल कोल्हेंची बॅग तपासली

उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची देखील बॅग तपासली गेली. याचा व्हीडिओ अमोल कोल्हे यांनी शेअर केला. आज पुन्हा बॅग तपासली गेली. विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दव ठाकरे साहेबांचीही तपासणी झाली. नियम असतात हे मान्य आहे. पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे!, असं अमोल कोल्हे म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.