‘भाजप अजुन किती झुकणार’; केजरीवालांवर अटकेच्या कारवाईनंतर शरद पवारांचा निशाणा

Sharad Pawar on Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेल्या अटकेच्या कारवाईनंतर देशभरातून केंद्र सरकार आणि भाजपवर विरोधकांनी टीका केली आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.

'भाजप अजुन किती झुकणार'; केजरीवालांवर अटकेच्या कारवाईनंतर शरद पवारांचा निशाणा
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 11:42 PM

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीआधी आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का आहे. याआधी मुख्यमंत्री केजरीवाल यांना तब्बल नऊ वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. आज ईडीचे पथक त्यांच्या घरी पोहोचले आणि काही वेळाने त्यांना अटक करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशभरातून केंद्र सरकार आणि भाजपवर विरोधकांनी टीका केली आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

निवडणुका तोंडावर आल्याने विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी सुरू असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा तीव्र निषेध. भाजप सत्तेसाठी अजुन किती खाली झुकणार हे या अटकेवरून दिसून येतं. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील कारवाईविरोधात इंडिया आघाडी एकजुटीने उभी आहे, शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दोन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दिल्ली दारू घोटाळ्यात ही अटक झाली आहे. या प्रकरणातील ही 16 वी अटक आहे. ईडीची टीम संध्याकाळी सात वाजता अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचली होती. आता त्यांना अटक करण्यात आली असून त्यांचा आजता मुक्काम ईडी कार्यालयात असणार आहे.

नेमका आरोप काय?

दिल्ली सरकारने 2021-22 साली दारुविक्रीबाबत एक नवीन धोरण बनवलं होतं. सरकारी महामंडळांऐवजी दारु विक्रीचे अधिकार खासगी वितरकांना देण्यात आले होते. दिल्लीतल्या एकूण 16 विक्रेत्यांना दारु वितरणाची जबाबदारी दिली. केजरीवाल सरकारने म्हटलं की, नव्या धोरणाने दारुचा काळाबाजार थांबला. नव्या धोरणामुळे दिल्ली सरकारच्या महसुलात मोठी वाढही झाली. मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांचा आहे. याच प्रकरणा आपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरूंगात आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.