Sharad Pawar on Raj Thackeray: पुन्हा जेम्स लेन! राज ठाकरेंचा आरोप पवारांनी ठामपणे खोडला, जेम्स लेनचं गलिच्छ लिखाण पुरंदरेंच्याच माहितीवर!
मुंबईः जेम्स लेनचं गलिच्छ लिखाण हे बाबासाहेब पुरंदरेंच्याच माहितीवर होतं. आपण जे लिखाण केलं, त्याची माहिती पुरंदरेंकडून घेतल्याचं लेन यांनी म्हटलं, असा दावा आज शरद पवारांनी केला.
मुंबईः जेम्स लेनचं गलिच्छ लिखाण हे बाबासाहेब पुरंदरेंच्याच माहितीवर आधारित होते. आपण जे लिखाण केलं, त्याची माहिती पुरंदरेंकडून घेतल्याचं लेन यांनी म्हटलं. जेम्स लेनने हे उघड सांगूनही पुरंदरे यांनी त्याचा खुलासा केला नाही. त्यामुळे मी पुरंदरेंवर टीका केली असेल, तर मला त्याचं दुःख नाही, तर अभिमान वाटतो. त्यामुळे यावर कुणी काय म्हटलं असेल, तर मला त्याबद्दल काही सुचवायचे नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना बुधवारी उत्तर दिले. ते मुंबईत बोलत होते. शरद पवार यांनी यावेळी राज यांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला. राज यांनी पाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर झालेल्या सभेत आणि काल ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत शरद पवारांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. या आरोपाला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ ते थेट सुप्रिया सुळेपर्यंत साऱ्यांनी उत्तर दिले. त्यानंतर आज पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले पवार?
शरद पवार पुढे म्हणाले की, पुरंदरेंबाबत मी बोललो असतो. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना जिजामातेनं शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व घडवलं हे सांगण्याऐवजी दादाजी कोंडदेव यांनी योगदान दिलं असं सांगितलं. त्याला माझा सख्त विरोध होता. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व हे राजमाता जिजामातेने कष्टानं उभं केलं. त्या व्यक्तिमत्त्वाचं मोठेपण या पदापर्यंत पोहोचायला कुणाचं योगदान होतं तर ते जिजाऊंचं होतं. पण पुरंदरेंनी त्याबाबत वेगळं मत मांडलं. ते योग्य नव्हतं. ते माझं मत आजही आहे आणि तेव्हाही होतं.
त्याचं दुःख वाटत नाही…
पवार म्हणाले की, जेम्स लेनने जे लिखाण केलं. त्याची माहिती त्यांनी पुरंदरेंकडून घेतल्याचं लेन यांनी म्हटलं. जेम्स लेनने हे उघड सांगूनही पुरंदरे यांनी त्याचा खुलासा केला नाही. त्यामुळे मी पुरंदरेंवर टीका केली असेल, तर मला त्याचं दुःख वाटत नाही तर अभिमान वाटतो. त्यामुळे यावर कुणी काय म्हटलं असेल तर मला त्याबद्दल काही सुचवायचे नाही, असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. इतर बातम्याः
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.