सर्वात मोठा ट्विस्ट! शरद पवारांच्या नवीन पक्षाचं नाव 20 दिवसच टिकणार, का जाणून घ्या!
शरद पवार यांच्या गटाला नवीन नाव मिळालं आहे. मात्र हे नाव फक्त वीस दिवसांसाठीच असणार आहे नवीन नाव हे फक्त वीस दिवसांसाठीच का असणार जाणून घ्या सविस्तर.
मुंबई : राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांकडे गेल्यावर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला तीन नाव सुचवायला सांगितली होतीत. त्यानंतर शरद पवार गटाकडून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदराव पवार अशी तीन नावं देण्यात आली होतीत. यामधील शरद पवार यांच्या पक्षाला नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हे नाव देण्यात आलं आहे. मात्र शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेलं नवीन नाव वीस दिवस वैध राहणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
राज्यसभेची निवडणूक तोंडावर आहे. आठ तारखेपासून नोटिफेकेशन आहे, म्हणून एक नाव लवकरात लवकर सूचवावं त्याप्रमाणे नावं दिलं आहे. चिन्हाचा विषय राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये होत नाही. त्यामुळे आज जे नाव दिलं आहे हे फक्त राज्यसभा निवडणुकीसाठी आहे. २७ तारखेनंतर परत शरद पवार पक्षाला अर्ज करावा लागणार आहे. इलेक्शन कनिशनने जे जजमेंट दिलं आहे त्यामधील शेवटच्या पॅरामध्ये उल्लेख असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. यावर शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देताना पटेल यांना निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हटलं आहे.
प्रफुल्ल पटेल हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत. ऑर्डर आहे ती फक्त त्यांनीच वाचली आहे. आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आहोत ना आम्हाला इंग्लिश कळत नाही. NCP शरद पवार हे नाव रास्त आहे कारण शरद पवार हेच NCP चे जन्मदाते आहेत. हा योगायोग पाहा कसा जुळून येतो. मनगटावरील घड्याळ चोरून घेऊन गेलेत, मनगट आमच्याजवळच आहे त्यामुळे आम्ही शरद पवारांसोबतच आहोत, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.