मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयाची यांच्या पित्ताशयावर यशस्वीपणे पार पडली आहे. काहीवेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. या शस्त्रक्रियेनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचेही मलिक यांनी सांगितले. काल संध्याकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. (NCP chief Sharad Pawar admitted Gall Bladder surgery completed)
Update
A successful Laparoscopy surgery was conducted today on our party President Sharad Pawar Saheb’s Gall Bladder by Dr. Balsara.
He is in stable health and is recuperating in his room at the Breach Candy Hospital, Mumbai— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 12, 2021
गेल्या 15 दिवसांमध्ये शरद पवार यांच्यावर झालेली ही दुसरी शस्त्रक्रिया आहे. 30 मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सात दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीच शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव यांनी केली होती.
इतर बातम्या :
‘पवारसाहेबांच्या’ प्रकृतीसाठी कार्यकर्त्यांकडून देव पाण्यात, मुंबईत होमहवन, पुण्यात विठ्ठलपूजा
(NCP chief Sharad Pawar admitted Gall Bladder surgery completed)