जनतेच्या सर्व्हेत शरद पवार बारामतीची जागा राखू शकणार नाहीत”; भाजप नेत्यानं आगामी निवडणुकीचा निकाल सांगितला
संजय राऊत तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तुम्ही उभे रहा तुमचा डिपॉझिट शंभर टक्के जप्त होणार असल्याची टीका भाजपने केली आहे.
मुंबईः राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली जात आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर बारामतीमध्ये भाजपने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत सभा घेतल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकाही करण्यात आली. तर यावेळी भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांना थेट आव्हान दिले आहे.
बारामतीची जागा शरद पवार राखू शकणार नाहीत असंही त्यांना सांगितले आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
जनतेच्या सर्व्हेमध्ये बारामतीची ही जागा जाणार असून शरद पवार बारामतीची जागा राखू शकणार नाहीत असा विश्वास भाजपचे नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सांगितलं की त्यांच्या सर्व्हेमध्ये सर्वाधिक जागा या त्यांच्या असणार आहेत.
मात्र शरद पवार या वेळेला जनतेच्या सर्व्हेमध्ये बारामतीचीही जागा जाणार तुम्ही बाकीची चिंता करू नका असा जोरदार हल्लाबोल त्यांच्यावर करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काम केले आहे. त्यामुळे तुम्ही बारामतीची जागा राखू शकणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
तर त्याचवेळी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तुम्ही उभे रहा तुमचा डिपॉझिट जप्त नाही झालं तर आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे नाव सांगणार नाही असं थेट त्यांना आव्हान देण्यात आले आहे.
माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे शरद पवार यांची बारामतीची सीट हातातून निघून जाणार असल्याचे सांगत. असा निकाल सर्व्हेमधूनच आला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात जोरदार फिल्डींग लावणार असल्याचे दिसून येत आहे.