Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवारसाहेबांचाच वडिलकीचा आधार, त्यांना लवकर बरं वाटू दे”

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना बाळासाहेबांनंतर पवार साहेबांचाच (Sharad Pawar) वडिलकीचा आधार आहे"

बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवारसाहेबांचाच वडिलकीचा आधार, त्यांना लवकर बरं वाटू दे
शरद पवार, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 12:18 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना बाळासाहेबांनंतर पवार साहेबांचाच (Sharad Pawar) वडिलकीचा आधार आहे. मी मुंबादेवी, महालक्ष्मीचरणी आणि सिद्धिविनायकाचरणी प्रार्थना करते की पवारसाहेबांना लवकर बरं वाटू देत, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) म्हणाल्या. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या. शरद पवारांना पित्ताशय आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर 31 मार्चला शस्त्रक्रिया होणार आहे. त्याबाबत महापौरांनी पवारांच्या प्रकृतीबाबत प्रार्थना केली. (Sharad Pawars elder support to Uddhav Thackeray after Balasaheb Thackeray praying for his good health) 

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “शरद पवार मोठे मराठा नेते आहेत. आमचे लोकनेते आहेत. बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवार साहेबांचाच वडिलकीचा आधार आहे. मी मुंबादेवी, महालक्ष्मीचरणी आणि सिद्धिविनायकाचरणी प्रार्थना करते की पवार साहेबांना लवकर बरं होऊ देत. ते लवकरच पुन्हा बरे होतील आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सक्रीय होतील”

मुंबईकरांचे आभार

मुंबईकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहे. मुंबईकरांना कुठेही गर्दी केली नाही त्याबद्दल त्यांचे आभार मानते, असं यावेळी महापौर पेडणेकरांनी सांगितलं.

जवळपास 95 टक्के लोक ऐकत आहेत मात्र पाच टक्के लोक अजूनही ऐकत नाही. माहिममध्ये जे काही झाले ते याच पाच टक्के लोकांमुळे झाले, त्यांना कुणी तरी असे करण्यासाठी उकसवले असावे. नियम मोडणाऱ्यांवर पॅंडेमिक अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

शरद पवार रुग्णालयात 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. शरद पवार (Sharad Pawar) यांना रविवारी सांयकाळी पोटात दुखू लागल्यानं अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांच्या पित्ताशयात दोष निर्माण झाल्याचं निदान झालं आहे. शरद पवार यांच्यावर 31 मार्चला एंडोस्कोपी शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

संबंधित बातम्या

Sharad Pawar health update: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात, 31 मार्चला शस्त्रक्रिया    

पोटदुखी आणि पित्ताशयाचा त्रास, शरद पवारांना नेमकं काय झालंय?  

एण्डोस्कोपी म्हणजे काय? ती वेदनादायी असते का? शरद पवारांवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया? 

(Sharad Pawars elder support to Uddhav Thackeray after Balasaheb Thackeray praying for his good health) 

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.