“जुनी पेन्शन आणि सरकारपुढं टेन्शन”; शिंदे-फडणवीस सरकार निर्णय काय घेणार..?
ज्या ज्या राज्यात काँग्रेसप्रणित शासन आहे त्या राज्याना जुनी पेन्शन योजना लागू केल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मुंबई : एकीकडे जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे सरकारकडून सांगण्यात आले आहे की, भूमिका सकारात्मक असली तरी जुनी पेन्शन तातडीने लागू होणार नाही ही भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे. त्यामुळे सरकारची भूमिका सकारात्मक असली तरी जुनी पेन्शन तातडीने लागू होणार नाही हे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यातच जुन्या पेन्शनबाबत आम्ही सकारात्मक असलो तरी त्यासाठी आर्थिक ताळेबंद कसा असेल यावर काही वेळ द्यावा लागणार असंही सरकारकडून सांगण्यात आले आहे.
आंदोलन म्हणतात की तुम्ही जुनी पेन्शन देणार की नाही याबद्दल अधिक ठोस हमी द्या सरकार सांगते की जुनी पेन्शन कशी लागू करायची त्याच्या अभ्यासासाठी एक समिती नेमण्यात आली.
तर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलकांनी सांगितले आहे की, इतर राज्य जर ही पेन्शन देऊ शकते तर महाराष्ट्र सरकार जिथे सर्वाधिक महसूल आहे त्या राज्याला ती शक्य का नाही असा सवाल आता आंदोलकांनी केला आहे.
त्यामुळे राज्य सरकारचे कर्मचारी, निमशासकीय, महापालिका, नगरपालिकांचे कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसहित आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.
तर जुनी पेन्शन योजनेसाठी ज्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे, त्यांना आता काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. त्यावर काँग्रेसकडून नाना पटोले यांनी सांगितले आहे की, ज्या ज्या राज्यात काँग्रेसप्रणित शासन आहे त्या राज्याना जुनी पेन्शन योजना लागू केल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.