Shinde Fadnavis: तारांकित प्रश्नांच्या फाईल्स मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पडून; शिंदे सरकारच्या पावसाळी अधिवेशन ठरणार वादळी; विरोधकाना चहापानाचे आमंत्रण
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपासून शिंदे-भाजप सरकार नेहमीच चर्चेत राहिले आहे. कधी मंत्रिमंडळ विस्तार तर कधी खाते वाटपाचे नाराजी नाट्य या ना त्या ना कारणाने शिंदे-फडणवीस सरकार चर्चेत राहिले. शिंदे-फडणवीस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे, त्यावरूनही जोरदार चर्चा झाली, हे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिंदे-भाजप सरकारचं […]
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपासून शिंदे-भाजप सरकार नेहमीच चर्चेत राहिले आहे. कधी मंत्रिमंडळ विस्तार तर कधी खाते वाटपाचे नाराजी नाट्य या ना त्या ना कारणाने शिंदे-फडणवीस सरकार चर्चेत राहिले. शिंदे-फडणवीस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे, त्यावरूनही जोरदार चर्चा झाली, हे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिंदे-भाजप सरकारचं पहिले अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. मात्र पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच ते अनेक मुद्यांनी गाजण्याची शक्यता आहे. एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाला असतानाच आता पावसाळी अधिवेशनालाही उशीर झाल्याने विरोधकांकडून (opposition party) सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. तारांकित प्रश्नांच्या फाईल्स (Starred question files) मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पडून असल्याची माहिती देण्यात आली असून मंत्र्यानाच माहिती घेण्यासाठी वेळ अपुरा असल्याचेही सांगण्यात येत आहे, त्यामुळे या सरकारच्या सत्तास्थापनेनंतर होणारे पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खातेवाटपानंतर माहिती घेण्यासाठी वेळ अपुरा असल्याचे सांगितले जात असून तारांकित प्रश्नांच्या फाईल्स मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पडून असल्याची टीकाही विरोधी पक्षांकडून केली जात आहे.
विरोधक सरकारला धारेवर धरणार
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर तब्बल 40 दिवसानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे.त्यातच गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यावर पावसाच्या संकटामुळे शेतकऱ्यांसह शहरांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. त्यावरूनही विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
सरकारकडून विरोधकांना चहापानासाठी आमंत्रण
शिंदे-भाजप सरकारचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, मात्र त्याआधीच शिंदे-भाजप सरकारचे पावसाळी अधिवेशन वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. उद्या होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारकडून विरोधकांना चहापानासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे विरोधक हे आमंत्रण स्वीकारणार की बहिष्कार टाकणार हे आता उद्याच कळणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत
विरोधी पक्षनेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद
पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत असून विरोधी पक्षनेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. अंबादास दानवे आणि अजित पवार यांच्या उपस्थिती ही पत्रकार परिषद होणार असून विरोध पक्षातील अनेक दिग्गज या पत्रकार परिषदेला उपस्थिती राहणार असून उद्या सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
विधान परिषद सभापती पदासाठी सागरवर बैठक
पावसाळी अधिवेशन उशिराच होत असल्याने आधीच चर्चेत राहिलेले आता सागर बंगल्यावरील बैठकीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विधान परिषदे सभापती पदासाठी सागर बंगल्यावर भाजप आमदारांची बैठक होणार असून यामध्ये विधान परिषदेसाठी आमदार राम शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आदित्य ठाकरेंची पहिल्याच दिवशी दांडी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आलेल्या या सरकारचे उद्यापासून पहिल्याच पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. या अधिवेशनाला चर्चेत असणारा चेहरा म्हणजे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या पावसाळी अधिवेशना दिवशीच आदित्य ठाकरे यांची रायगडमध्ये शिवसंवाद यात्रा असल्याने ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याने पावसाळी अधिवेशनाला ते दांडी मारणार असल्याचे दिसत आहे.