दीपक केसरकरांची मांडवली आणि अंधारेंचं एका वाक्यात विश्लेषण…
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राणे यांच्या विरोधात दंड थोपटले असले तरी तो विरोध नव्हता तर ती त्यांची मांडवली होती.
सिंधुदुर्गः शिंदे गट आणि ठाकरे गटातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा आहे तर दुसरीकडे शिंदे गटातील अनेक नेत्यांकडून सुषमा अंधारे यांच्या उत्तराला प्रत्युत्तरही दिले जात आहे. मात्र आज सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी सुषमा अंधारे यांनी दीपक केसरकर राजकीय फायद्यासाठी ते मांडवली करतात अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
आमदार दीपक केसरकर यांच्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीपक केसरकर यांनी सत्तेसाठी मांडवली केली होती.
दहशत संपवणे आणि मांडवली करणे यामध्ये फार फरक असल्याचे सांगत दीपक केसरकर यांनी थेट राणे यांच्याबरोबरच मांडवली केल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर हे मांडवली करताना आपण दोघं भाऊ-भाऊ सिंधुदुर्ग वाटून खाऊ अशा अर्थानं त्यांनी मांडवली केली असल्याची गंभीर टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
त्यामुळे ते आज जरी ते राणेंच्या विरोधात त्यांनी आधी दंड थोपटले असले तरी ते पालकमंत्री झाले तेव्हा त्यांनी सगळ्यात जास्त निधी आणि कामांची कंत्राटं ही निलेश राणे आणि नितीश राणे यांनाच दिली असल्याचा त्यांचा इतिहास असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतही त्यांनी नारायण राणे यांच्यासह त्यांनी त्यांच्या दोन्ही सुपुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला होता.
यावेळीही त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना त्यांनी राणे यांच्याविरोधात त्यांनी दंड थोपटले असले तरी पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी कंत्राटी कोणाला दिली हे तपासून पाहा असंही सुषमा अंधारे यांनी सांगितले.