“कशासाठी वकिलांची फौज उभा करताय”; धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाच्या नेत्याने ठाकरे गटाला डिवचले

जर न्यायालयाच्या निर्णयावर विश्वास नसेल, न्यायालयाच्या निर्णयावर विलंब होत असल्याचा ठपका ठेवत असतील तर ठाकरे गटाकडून वकिलांची फौज न्यायालयात का उभा केली जात आहे असा सवाल त्यांनी संजय राऊत यांना केला आहे.

कशासाठी वकिलांची फौज उभा करताय; धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाच्या नेत्याने ठाकरे गटाला डिवचले
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 6:52 PM

मुंबईः शिवसेना संपवण्याची सुपारी खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वावादाची ही शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या दिवसापासून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे, तेव्हापासून संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाला धनुष्यबाणाबाबत न्यायालय निकाल का देणार आहे हे माहिती असल्यामुळेच त्यांनी शिंदे गटावर टीका करत आहेत.

कोणताही पक्ष असो किंवा राष्ट्रीय पक्षाची मान्यता असो ही लोकप्रतिनिधींच्या बहुमतावरच अवलंबून असते. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि त्या पक्षाच्या धनुष्यबाणावर शिंदे गटाचा हक्क आहे. लोकशाहीमध्ये बहुमताल मान्यता आहे.

त्यामुळे आमच्या शिंदे गटाकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निकाला ठाकरे गटाला माहिती असल्यामुळेच त्यांच्याकडून निकालाबाबत दुटप्पीपणाची भूमिका मांडली जात असल्याची टीका नरेश म्हस्के यांच्याकडून केली गेली आहे.

सध्या खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधी यांच्या गळ्यात गळे घालून ही यात्रा केली आहे.

मात्र यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्य्याला काय वाटले असेल असा सवाल नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना धनुष्यबाणावरून त्यांनी टीका केली आहे.

ते म्हणाले आहे की, त्यांना जर न्यायालयाच्या निर्णयावर विश्वास नसेल, न्यायालयाच्या निर्णयावर विलंब होत असल्याचा ठपका ठेवत असतील तर ठाकरे गटाकडून वकिलांची फौज न्यायालयात का उभा केली जात आहे असा सवाल त्यांनी संजय राऊत यांना केला आहे.

ठाकरे गटाकडून धनुष्यबाणाविषयी कायम दुटप्पीपणाची भूमिका मांडली जात आहे. त्यातच शिंदे गटाकडे बहुमत असल्यामुळे न्यायालयाचा निर्णय काय लागणार आहे हे ठाकरे गटाला समजल्यामुळेच त्यांच्याकडून भावनिक राजकारण केले जात आहे असा टोलाही नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.