Eknath Shinde : ‘…तेव्हा XXX पातळ झालेली’; मोदी-ठाकरेंच्या ‘त्या’ भेटीबाबत एकनाथ शिंदेंकडून मोठा गौप्यस्फोट!
उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. ठाकरेंनंतर शिंदेंनी आपल्या सभेमध्ये बोलताना एक भेटीबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे आणि शिंदे गटाने शक्ती प्रदर्शन केली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. षण्मुखानंद या सभागृहामध्ये बोलताना ठाकरेंनी तोफ डागली. मनिपूर, लसीवरून त्यांनी केंद्राला लक्ष्य केलं. ठाकरेंनंतर शिंदेंनी आपल्या सभेमध्ये बोलताना एक भेटीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी किती शिव्या दिल्या. अब्दाली, हिटलर, अफजलखान…अरे ते कुठे आणि तुम्ही कुठे, सर्व राज्याने पाहिलं आहे की एक नोटीस आली त्यावेळी लेंडी पातळ झाली होती. शिष्टमंडळ घेऊन गेले होते मोदींना भेटायला तेव्हा शिष्टमंडळ ठेवलं बाहेर आणि शिष्टाई गेली आत. हे आम्हाला काही माहित नाही का? सर्व माहित असल्याचं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
रिक्षावाला म्हणून हेटाळणी करत होताे मात्र याच रिक्षाने तुमच्या मर्सडिजला खड्ड्यामध्ये गाडून टाकलं. सर्वसामान्यांची रिक्षा असून नादी लागू नका. भाजीवाले, चहावाले, टॅक्सीवाले यांना घेऊन बाळासाहेबांनी यांनाच घेऊन शिवसेना मोठी केली. आतापर्यंच्या इतिहासात जितक्या सहा झाल्या तेवढ्या मी एकाच दिवसात केल्या. अगोदरचे मुख्यमंत्री पेन ठेवचत नव्हते पण माझ्याकडे दोन पेन असल्याचं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर आक्रमण केलं.
दरम्यान, बिपरजॉय वादळ आलं तेव्हा तीन दिवस गुजरातमध्ये तळ ठोकून बसले होते. मात्र 26 जुलैच पूर आला तेव्हा तुम्ही आमच्या दैवत बाळासाहेबांना सोडून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायला गेला होतात हे काय माहित नाही का कोणाला? असंही शिंदे म्हणाले.