शिवसेना नगरसेवकाला दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडलं
मुंबई : शिवसेना नगरसेवक कमलेश यशवंत भोईर (Kamlesh Bhoir) यांना दहा हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. ठाणे लाचलुचपत विभागाने सोमवारी रात्री ही कारवाई केली. कमलेश भोईर यांना त्यांच्याच ऑफीसमध्ये पकडण्यात आलं. नगरसेवक कमलेश भोईर यांनी काशिमीरा इथल्या मुन्शीकंपाऊंडजवळ सुरु असलेल्या बांधकामाकरिता 25 हजाराची लाच मागितली होती. त्याबाबत तक्रारदाराने ठाणे एसीबीकडे तक्रार दिली होती. या […]
मुंबई : शिवसेना नगरसेवक कमलेश यशवंत भोईर (Kamlesh Bhoir) यांना दहा हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. ठाणे लाचलुचपत विभागाने सोमवारी रात्री ही कारवाई केली. कमलेश भोईर यांना त्यांच्याच ऑफीसमध्ये पकडण्यात आलं.
नगरसेवक कमलेश भोईर यांनी काशिमीरा इथल्या मुन्शीकंपाऊंडजवळ सुरु असलेल्या बांधकामाकरिता 25 हजाराची लाच मागितली होती. त्याबाबत तक्रारदाराने ठाणे एसीबीकडे तक्रार दिली होती.
या तक्रारीनंतर ठाणे एसीबीने सापळा रचून दहा हजार रुपये स्वीकारत असताना, कमलेश भोईर यांना अटक केली. कमलेश भोईर मीरा भाईंदर महानगर पालिका प्रभाग 15 चे शिवसेना नगरसेवक आहे. त्यांना अटक झाल्याने परिसरात एकच चर्चा सुरु होती.