Eknath Shinde: बंडखोर आमदारांना काय तो दांडा, काय ते ढुं… म्हणणाऱ्या शीतल म्हात्रेच शिंदे गटात, राऊतांच्या ‘वाघिणी’चाही धक्का

शीतल म्हात्रे या एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार आहेत(Eknath Shinde group). त्यांच्या हा निर्णय शिवसेनेसाठी जबरदस्त झटका मानला जात आहे.

Eknath Shinde: बंडखोर आमदारांना काय तो दांडा, काय ते ढुं... म्हणणाऱ्या शीतल म्हात्रेच शिंदे गटात, राऊतांच्या 'वाघिणी'चाही धक्का
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 9:33 PM

मुंबई : काय तो दांडा, काय ते ढुं… असं म्हणत एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे(Shiv Sena corporator Sheetal Mhatre) यांनी देखील उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का दिला आहे. शीतल म्हात्रे या एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार आहेत(Eknath Shinde group). त्यांच्या हा निर्णय शिवसेनेसाठी जबरदस्त झटका मानला जात आहे. आपल्या सह 41 पेक्षा अदिक आमदार नेत एकनाथ शिंदे यांनी नुसती बंडखोरीच केली नाही तर. थेट महाविकास आघाडी सरकार देखील पाडले. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिवसेना नेमकी कुणाची एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरेंची असा संघर्ष पेटला आहे. त्यातच राज्यभरातील अनेक शिवसेना खासदार, आमदार यांच्यासह माहापालिका नगरसेवकांचा शिंदे गटाला मिळाला पाठिंबा देखील वाढत आहे. यामुळे शिंदे गटाची ताकद वाढत आहे.

शितल म्हात्रे यांनी  एकनाथ शिंदेंच्या बंडखोर आमदारांवर केली होती टीका

उद्धव ठाकरेंसह असलेल्या अनेकांनी त्यांची साथ सोडून ते शिंदे गटात सामील झाले. एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरुवातीला गेलेल्या आमदारांमध्ये संतोष बांगर यांचा समावेश नव्हता. उलट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी मी निष्ठावान असून बंडखोर आमदरांनी परत यावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं. अशाच प्रकारे बंडखोर आमदारांना काय तो दांडा, काय ते ढुं… म्हणत सडकून टीका करणाऱ्या शिवसेनेच्या दहीसर येथील प्रभाग क्रमांक सातच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे देखील शिंदे  गटात सामील झाल्या आहेत.

शीतल म्हात्रे यांच्या सोबतच पश्चिम उपनगरातील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सुद्धा शीतल म्हात्रे यांच्यासोबत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेची वाघीण अशी त्यांची ओळख आहे. शीतल म्हात्रे या शिवसेनेच्या पहिल्या नगरसेविका आणि शिवसेना प्रवक्त्या आहेत.  शीतल म्हात्रे दोन वेळा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत.

सजंय राऊत म्हणाले होते शितल म्हात्रे फायर है!

ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथमधील नगरसेवकांचा शिंदे गटाला थेट पाठींबा

एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर शिवसेना-भाजपचे नवे सरकार अस्तित्वात आले.  यानंतर शिंदे गटाचा पाठिंबा वाढत आहे. ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथमधील नगरसेवकांनी थेट एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिला.

दाऊदशी संबंध असणाऱ्या लोकांसोबत आम्हाला राहावं लागलं; शीतल म्हात्रे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जातोय त्याला आपल्या सर्व पदाधिकाऱ्यासोबत पाठिंबा दिल्याचे शीतल म्हात्रे म्हणाल्या. दाऊदशी संबंध असणाऱ्या लोकांसोबत आम्हाला राहावं लागलं त्यावर काही बोलता आलं नाही. शिवसैनिकांच खच्चीकरण झालं होतं आम्ही जो निर्णय घेतला तो बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणार नाही. मुंबईतील 5 आमदारांनी आमच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. सभागृहात आल्यानंतर त्यांनी कोणाला मतदान केले हे सगळ्यानी पाहिलेलं आहे. काही लोक तर म्हणत होते मुंबईत येऊन दाखवा, या रस्त्याने जाऊन दाखवा पण काही झालं का ? असं म्हणत म्हात्रे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.

कोण आहेत शीतल म्हात्रे

शिवसेना आमदारांच्या बंडखोरी नंतर संजय राऊत यांनी शीतल म्हात्रे यांचा शिवेसेनेच्या अग्नी कन्या असा उल्लेख केला होता. दहीसर विभागातून त्या दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.  त्यांच्या आक्रमक शैलीमुळे शिवसेनेने त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली होती.  मुंबई महापालिकेत त्या शिक्षण समीती आणि विधी समीत्याच्या अध्यक्षा होत्या आक्रमक नगरसेविका अशी ओळख.  दांडगा जनसंपर्क आणि दहीसरमधील शिवसेनेचा चेहरा अशी त्यांची ओळख आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.