अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी शिवसेनेत मोठ्या हालचाली, ठाकरे गटाच्या आमदारांना अडचणीत आणण्यासाठी अनोखी शक्कल

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिवसेनेकडून (Shiv Sena) ठाकरे गटाच्या (Thackeray Group) आमदारांना व्हीप जारी करण्यात आलाय. शिवसेना प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्याकडून व्हीप जारी करण्यात आलाय.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी शिवसेनेत मोठ्या हालचाली, ठाकरे गटाच्या आमदारांना अडचणीत आणण्यासाठी अनोखी शक्कल
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 9:59 PM

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिवसेनेकडून (Shiv Sena) ठाकरे गटाच्या (Thackeray Group) आमदारांना व्हीप जारी करण्यात आलाय. शिवसेना प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्याकडून व्हीप जारी करण्यात आलाय. व्हीप न पाळल्यास दोन आठवड्यात कारवाईचा विचार करु, असा इशारा भरत गोगावले यांनी दिलाय. सर्व आमदारांना अधिवेशनाला पूर्ण वेळ हजर राहण्याचा व्हीप बजावला आहे. सर्व 55 आमदारांसाठी हा व्हीप जारी केलाय. ज्यांनी व्हीप पाळला नाही त्यांच्यावर सध्या कारवाई करणार नाही, पण नंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करु, असं भरत गोगावले म्हणाले आहेत.

“सुप्रीम कोर्टाने आता दोन आठवड्याची वेळ दिलेली आहे. त्यामुळे एक आठवडा तर होत आलाय. आम्ही या सगळ्या उर्वरित ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावले आहे. त्यांनी अधिवेशनाला हजर राहावे. व्हीप पाळला नाही तर आठवड्यानंतर सुप्रीम कोर्ट जो आदेश देईल त्यानुसार कारवाई होईल”, असं भरत गोगावले यांनी सांगितलं.

भरत गोगावले यांचा ठाकरे गटावर निशाणा

“जर ऐकलं नाही तर रितसर कारवाई करणार. आम्ही पक्ष सोडला नाही, त्यांनी समजावं काय खायचं ते”, असा इशारा गोगावले यांनी दिला. “ठाकरे गटाच्या घरांच्या डोक्यावर 100 टक्के अटकेची टांगती तलवार आहे”, असंही ते यावेळी म्हणाले. “त्यांनी चालताना, बोलताना बरोबर चालवं नाहीतर कारवाई होणार”, असादेखील इशारा त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

“बत्तीस वर्षाचं काय म्हणता आमच्यात तीस वर्षाच्या आत मुलांची लग्न होतात. एवढं कोणी थांबत नाही. तर त्यांनी आधी लग्न करावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुलना करण्यासाठी आदित्य ठाकरे यांना बरीच वर्ष काढावी लागतील. शिंदेंचा नाद करू नये”, असं भरत गोगावले म्हणाले.

“वरळीत जांभोरी मैदानात तीन-तीन पक्षाची ताकद तिकडे वापरली जाते. चालले ते जाऊ नये म्हणून धडपड सुरू आहे”, असं भरत गोगावले म्हणाले. तसेच “कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं मतदान संपलेलं आहे. आता निकाल येणार. रिझल्टमध्ये जर दोन्ही सीट पराभूत झाल्या तर संजय राऊत काय करणार?”, असा सवाल त्यांनी केला. “काँग्रेस नेत्या सोनिया गांधी संन्यास घेतायत तर संजय राऊत यांनी देखील संन्यास घ्यावा. घेतला तर ठाकरे गटाला स्थिरता मिळेल”, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

“आम्हाला जर जाणूनबुजून अधिवेशनामध्ये पायऱ्यांवरती त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही यावेळी गप्प बसणार नाही. आम्ही ज्यावेळी तुम्ही पायऱ्यांवर असाल आम्ही येणार नाही आणि आम्ही असू तेव्हा तुम्ही यायचं नाही. आम्हाला काय चु### समजले काय?”, असा घणाघात भरत गोगावले यांनी केला.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.