“निवडणूक आयोगाला जी चिन्हं नको असतील ती आम्ही घेवू”; ठाकरे गटाने चिन्हाच्या निर्णयावर आपलं मत सांगितलं…

| Updated on: Feb 18, 2023 | 5:05 PM

भाजपने अगदी खालच्या पातळीवर जाऊन सर्व प्रकारचे राजकारण केले आहे. त्यामुळे जरी शिंदे गटाने व्हिप बजावले असले तरी त्या कारवायांना आ्ही घाबरत नाही असंही स्पष्टपणे त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाला जी चिन्हं नको असतील ती आम्ही घेवू; ठाकरे गटाने चिन्हाच्या निर्णयावर आपलं मत सांगितलं...
Follow us on

मुंबईः ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये स्थापन केलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले असल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णय असला तरी मी आता खचणार नाही असा पवित्रा घेत, पुन्हा एकदा शिवसैनिकांनी जोरदारपण कामाला लागा असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या निर्णयामुळे राजकारण ढवळून निघाले असले तरी ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि ठाकरे कधीही राजकारणात कमी पडणार नाही अशी भावना ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

ही भावना व्यक्त केली जात असतानाच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे यांनी शिंदे गटासह ठाकरे गटावर जोरदार टीका करत, भाजपनं कितीही निच्चतम पातळी गाठून प्रयत्न केला तरी ठाकरे संपणार नाही असं थेटपणे भाजपला आणि शिंदे गटाला त्यांनी सांगितले आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गटाची न्यायालयीन लढत जोरदार झाली असली तरी आता व्हिपचा प्रश्न समोर आला आहे. त्यावरूनही ठाकरे गटाला लक्ष्य केले जात आहे.

आता शिवसेना आणि धनुष्यबाण हे शिंदे गटाला मिळाले असल्यामुळे ठाकरे गट आता कुणाचे व्हिप मानणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यावरही सुषमा अंधारे यांनी बोलताना सांगितले की, व्हिप वैगेरे शेवटची खेळी असेल पण आम्ही ठाकरे यांचाच व्हिप मानणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आता व्हिपवरुन आणि राजकारण तापणार असल्याचेही दिसत आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका करताना त्यांनी भाकरीचे उदाहरण दिले आहे. शिंदे गटाला आम्ही भाकरीचा एक तुकडा खायला दिला तर त्यांना आता पूर्ण भाकरीच हवी आहे असा घणाघात शिंदे गटावर त्यांनी केला आहे.

शिंदे गटावर आणि भाजपवर टीका करताना ज्यावेळी व्हिपबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. तर आता यांनी जेवढं वाईट करायचे आहे. तेवढे यांनी वाईट केले आहे.

त्यातच भाजपने अगदी खालच्या पातळीवर जाऊन सर्व प्रकारचे राजकारण केले आहे. त्यामुळे जरी शिंदे गटाने व्हिप बजावले असले तरी त्या कारवायांना आ्ही घाबरत नाही असंही स्पष्टपणे त्यांनी सांगितले.

तर ज्या शिवसेना आणि धनुष्यबाणासाठी न्यायालयीन लढा देण्यात आला आहे. त्यातून शिवसेनेचे जेवढे वाईट करायचे होते. ते त्यांनी केले आहे.

त्यामुळे ज्या प्रमाणे त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण काढून घेतले आहे. त्यामुळे आता आम्ही निवडणूक आयोगाला आम्ही चिन्हाचा अल्बम देणार आहोत.

त्यातील जी काही चिन्हे शिंदे गटाला, भाजप समर्थकांना द्यायची आहेत. ती त्यांनी सगळ्यांना द्यावी आणि राहिलेली चिन्हं आम्हाला त्यांनी द्यावी त्यावर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवू असंही त्यांनी जाहीरपणे सांगितले.