“होतं थोडं वर खाली मात्र मुख्यमंत्र्यांवर कुणीही नाराज नाही”; ‘या’ नेत्यानं मंत्रिमंडळ विस्तारावर महत्वाचं ते सांगितलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. त्यामुळे अनेक शिवसेनेतील नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गट आणि शिवसेना हा वाद शिगेला पोहचला आहे. त्यातच हा वाद न्यायालयात गेल्यानंतर व्हीपचाही प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे शिवसेनेकडून ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावण्यावरूनही वाद उफाळून आला आहे. त्यातच पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारावरून ठाकरे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.
त्यातच शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करत आम्ही आमच्या परीने काम करत आहे. त्याचा परिणाम निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला मिळणार असल्याचेही भरत गोगावले यांनी सांगितले.
शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी आम्हाला आवाहन देण्याचं काम केलं आहे. मात्र आदित्य ठाकरे सध्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम ते करत आहेत.
मात्र आमच्या गटातील लोकप्रतिनिधींकडून आपापल्या परीने काम करत आहेत. फक्त गर्दी जमवून काही होतं नाही, तर आदित्य ठाकरे यांना पुण्याच्या निवडणुकीतून त्यांना उत्तर मिळणार असल्याचा इशााराही त्यांनी यावेळी दिला आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद न्यायालयात गेल्यानंतर व्हीपचा मु्द्दा ऐरणीवर आला होता. शिवसेनेकडून आम्हाला व्हीप ते बजावू शकत नाहीत असं ठाकरे गटानेही त्यावेळी सांगण्यात आले होते.
तर आता भरत गोगावले यांनी सांगितले की, आम्ही 56 जणांसाठी व्हीप बजावला आहे. मात्र हा कारवाईचा व्हीप नाही. तर सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लघंन करण्यात आले नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले की, न्यायालयाकडून आम्हाला दोन आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले तर पक्ष विरोधात भूमिका राहिली तर मात्र कारवाई केली जाणार असल्याचा इशारा भरत गोगावले यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. त्यामुळे अनेक शिवसेनेतील नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावर बोलताना भरत गोगावले म्हणाले की, मंत्री मंडळ विस्तार लवकरच होणारच आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही म्हणून कोणीही नाराज नाही.
हाताची बोट सारखी नसतात, तशी काही परिस्थिती असते तशी काही परिस्थिती असते. त्यामुळे थोडं वर खाली होतं, मात्र मुख्यमंत्र्यांवर कुणीही नाराज नाही. कोणतंही काम करत असताना थोडा फार विलंब होणारच असंही भरत गोगावले यांनी सांगितले.