अजितदादांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारण, इतरांनी केलं असतं तर खंजीर खुपसला?; राऊतांचा हल्लाबोल सुरूच

खंजीर खुसपणं या शब्दावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (shiv sena leader sanjay raut reaction on chandrakant patil's comment stabbed in back)

अजितदादांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारण, इतरांनी केलं असतं तर खंजीर खुपसला?; राऊतांचा हल्लाबोल सुरूच
sanjay raut
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 11:15 AM

मुंबई: खंजीर खुसपणं या शब्दावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अजित पवारांना घेऊन त्यांनी सरकार बनवलं ते राजकारण. इतरांनी केलं असतं तर खंजीर खुपसला?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. (shiv sena leader sanjay raut reaction on chandrakant patil’s comment stabbed in back)

संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. राजकारणात कोणी साधूसंत असतं का? तुमचं आज राज्यात सरकार नसेल. पण आमचं तीन पक्षाचं सरकार आहे ना, तरीही तुम्हाला तुमचं सरकार यावसं वाटतं. याला काय म्हणतात? हे राजकारण आहे, असं सांगतानाच दुसऱ्याने केलं तर पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही भल्या पहाटे अजित पवारांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारण. दुसरं कोणी केलं असतं तर पाठीत खंजीर खुपसला. राजकारणात देशभरात अशा गोष्टी सुरू असतात. मध्यप्रदेशात माधवरावांच्या सुपुत्रांना काँग्रेसपासून फोडलं. ते राजकारण. दुसरं कोणी केलं असतं तर खंजीर खुपसला. हे शब्द आता राजकारणात कोणी वापरू नयेत. वापरले जाऊ नयेत. राजकारण गेल्या काही वर्षापासून याच पद्धतीने सुरू आहे. याला पारदर्शक राजकारण म्हणत नाही, असं राऊत म्हणाले.

खटला कुणावर दाखल करणार?

कुणाचा कोथळा बाहेर काढणार मी ते सांगायला पाहिजे ना. ते पाठित खंजीर खुपसणार होते. चंद्रकांत पाटील पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करत होते. त्यावर आपली परंपरा करा काय आहे हे मी त्यांना समजावत होतो. ती आपली परंपरा नाही, आपण समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून वार केला हे मी सांगत होतो. आता चंद्रकांत पाटील कुणावर खटला दाखल करणार याची माहिती घ्यावी लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला.

मी इतिहासाचा अभ्यासक

चंद्रकांतदादांना आम्ही शिवचरित्रं पाठवू. शिवचरित्रं त्यांनी वाचलं पाहिजे. सेतू माधवराव पगडींचं शिवचरित्रं पाठवू. बाबासाहेब पुरंदेरंचं पाठवू. रियासतकारांचं पाठवू. अनेक शिवचरित्रांचे खंडं आले आहेत. यातील एखादं पाठवू. त्यांनी ते वाचावं. इतिहासात कोथळा काढणं म्हणजे नक्की काय? त्याचा त्यांनी अभ्यास केला तर आम्ही चर्चा करू. मी इतिहासाचा अभ्यासक आहे. आम्ही नुसतं राजकारण करत नाही. आम्ही इतिहास समजून घेतो. इतिहास घडवतो. आम्ही इतिहास चिवडत बसत नाही, अशी टीका त्यांनी केली.

वेट अँड वॉच करणंच योग्य

यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आलेल्या नोटिशीवर भाष्य केलं. अनिल देशमुख ला पहिल्यांदा नोटीस आलेली नाही. लूक आऊट नोटीसही अनेकदा याच्या आधी बजावली गेली आहे. कायद्याची लढाई सध्याची सुरू आहे. कोर्टात केस प्रलंबित आहे. त्यावर अधिक बोलणं योग्य नाही. त्यात वेट अँड वॉच करणं महत्त्वाचा आहे, असं त्यांनी सांगितलं. (shiv sena leader sanjay raut reaction on chandrakant patil’s comment stabbed in back)

संबंधित बातम्या:

कोथळा काढणं म्हणजे नक्की काय?, चंद्रकांतदादांना पुरेंदरेंचं शिवचरित्रं पाठवू, त्यांनी वाचावं; राऊतांचा खोचक टोला

संघाची तालिबानशी तुलना, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा; नितेश राणेंचं जावेद अख्तरांना पत्रं

Anil Deshmukh | अनिल देशमुखांविरोधात ईडीची लूकआऊट नोटीस, देश सोडण्यास मज्जाव

(shiv sena leader sanjay raut reaction on chandrakant patil’s comment stabbed in back)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.