राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये; राऊतांनी काँग्रेसला सुनावले

औरंगाबादच्या नामांतराचा विषय माझ्यासाठी संपला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. | Sanjay Raut

राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये; राऊतांनी काँग्रेसला सुनावले
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 10:44 AM

मुंबई: औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा व्होटबँकेचा मुद्दा नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातच काय देशातही औरंगजेबाच्या नावाबाबत कुणीही आग्रही असू नये, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ( Sanjay Raut on Aurangabad name changing issue)

ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या काही टोले लगावले. औरंगाबादच्या नामांतराचा विषय माझ्यासाठी संपला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

तसेच औरंगाबादचे नामांतर हा कॉमन मिनिमम प्रोग्रामचा भाग नाही. हा लोकभावनेचा विषय आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसला आमनेसामने आणू नये, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

देशात शिवाजी महाराजांसारखा सेक्युलर राजा झाला नाही: संजय राऊत

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. मात्र, आजवर देशात त्यांच्याइतका सेक्युलर राजा झाला नाही. बाबर, निजाम, औरंगजेब ही काही आपली प्रतिकं असू शकत नाहीत. हा देशाच्या आणि राज्याच्या अस्मितेचा विषय आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

‘…तर संसदेच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारू’

दिल्लीच्या सीमेवर 50 हून अधिक दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि आंदोलनाची एकूण धग पाहता केंद्र सरकारला कृषी कायद्यांबाबत लवकर निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षांना केंद्र सरकारला जाब विचारावा लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

‘औरंगजेब कुणाला प्रिय?’ रोखठोकमधून काँग्रेसच्या ‘सेक्युलर’वादावर राऊतांचा निशाणा

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून काँग्रेसच्या सेक्युलरवादी भूमिकेवरच निशाणा साधण्यात आला आहे. मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेस नामांतराला विरोध करत असल्याची टीका राऊतांनी रोखठोक या सदरातून केली.

हिंदुस्थानची घटना सेक्युलर आहेत. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबाला परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा हिंदूंचा छळ केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्या? असा सवाल संजय राऊत यांनी काँग्रेसला विचारला.

संबंधित बातम्या:

Special Story | औरंगाबाद की संभाजीनगर? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाद आणि राजकारण!

औरंगाबादेत बॅनरवॉर, लव्ह औरंगाबाद बोर्डासमोर भाजपचे ‘नमस्ते संभाजीनगर’

आमचा सरकारमध्ये समान अधिकार, औरंगाबादच्या नामांतराला विरोध, काँग्रेसने ठणकावलं

( Sanjay Raut on Aurangabad name changing issue)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.