मग तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का; सुभाष देसाईंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
गेल्या पाच वर्षांमध्ये सत्ता कुणाकडे होती, सर्व सत्ताधीश कोण होते? मात्र, त्यावेळी औरंगाबादचे नामांतर त्यांच्यासाठी प्राधान्याचा मुद्दा नव्हता. | Subhash Desai
मुंबई: औरंगाबादच्या नामांतरच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची सातत्याने कोंडी करु पाहणाऱ्या भाजपला शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी चांगलेच फटकारले आहे. नामांतराच्या मुद्द्यावरुन भाजप शिवसेनेला टोमणे मारते. चंद्रकांत पाटील यांना औरंगाबादच्या नामांतराविषयी (Aurangabad renaming) इतकीच बांधिलकी होती तर तुमचे सरकार असताना हा निर्णय का घेण्यात आला नाही? तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का, असा खरमरीत सवाल सुभाष देसाई यांनी भाजपला विचारला. (Shiv Sena leader Subhash Desai hits back Chandrakant patil over Aurangabad renaming issue)
औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी नामांतरच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला घेरणाऱ्या भाजपचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय का घेण्यात आला नाही? त्यामुळे आता भाजपने आम्हाला उपदेश करण्याची गरज नाही. आमचं कर्तव्य म्हणून आम्ही औरंगाबादच्या नामांतरासाठी प्रयत्न करत आहोत आणि आम्ही ते करणारच, असे देसाई यांनी स्पष्ट केले.
‘नामांतर कधी होणार हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही’
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन आम्हाला राजकारण करायचे नाही. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा दिलेला आदेश आमच्यासाठी पूर्व दिशा आहे. पाच वर्षांच्या कालावधीत औरंगाबादचे नामांतर होणार का, माहिती नाही. ते सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असे सुभाष देसाई यांनी म्हटले.
गेल्या पाच वर्षांमध्ये सत्ता कुणाकडे होती, सर्व सत्ताधीश कोण होते? मात्र, त्यावेळी औरंगाबादचे नामांतर त्यांच्यासाठी प्राधान्याचा मुद्दा नव्हता. आता त्या मुद्द्यावरुन राजकारण करुन फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेला ही सर्व परिस्थिती माहिती आहे, असे सुभाष देसाई यांनी म्हटले.
‘शिवसेना आणि काँग्रेस भावनेच्या राजकारणाला फसणार नाहीत’
निवडणुका आल्या की लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक मुद्दे उकरून काढले जातात. ही काही मंडळींची पद्धत आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना या चालीला फसणार नाहीत, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
नाव बदलल्याने सामान्य माणसाचं जीवन बदलत नाही. उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलून काय झालं, हे पाहिलं पाहिजे. सामान्य माणसाचे भले कसे होईल, यादृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे आपलं उद्दिष्ट काय आणि आपण कशी वाटचाल करायची याबाबत संबंधितांशी चर्चा करु, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
काँग्रेस-शिवसेनेची नुरा कुस्तीच, निवडणुकीनंतर औरंगाबादचा ‘तो’ मुद्दा बाजूला पडेल: देवेंद्र फडणवीस
शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का; किरीट सोमय्यांचा सवाल
औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे : चंद्रकांत पाटील
(Shiv Sena leader Subhash Desai hits back Chandrakant patil over Aurangabad renaming issue)