रामभक्तांना भिकारी म्हणता, शिवसेनेचं हे कसलं हिंदुत्व: राम कदम

राम मंदिराच्या उभारणीत प्रत्येक रामभक्ताला योगदान द्यायचे आहे. राम मंदिरासाठी आपण किमान एकतरी वीट द्यावी, अशी भावना प्रत्येक हिंदुच्या मनात आहे. | Ram Kadam

रामभक्तांना भिकारी म्हणता, शिवसेनेचं हे कसलं हिंदुत्व: राम कदम
आम्ही घरामध्ये होळी पेटवायची का?
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 12:44 PM

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करणाऱ्या रामभक्तांना शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी भिकारी म्हटले. हे शिवसेनेचं कसलं हिंदुत्व आहे, असा सवाल भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी उपस्थित केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे रामभक्तांचा अपमान झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने सर्व रामभक्तांची तातडीने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राम कदम यांनी ट्विटवरुन केली. राम मंदिराच्या उभारणीत प्रत्येक रामभक्ताला योगदान द्यायचे आहे. राम मंदिरासाठी आपण किमान एकतरी वीट द्यावी, अशी भावना प्रत्येक हिंदुच्या मनात आहे. पण शिवसेनेचे मंत्री त्यांना भिकारी म्हणतात. शिवसेनेचं हे कोणत्या प्रकारचं हिंदुत्व आहे, असा सवाल राम कदम यांनी विचारला. (BJP MLA Ram Kadam slams Shivsena leader Abdul sattar)

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपकडून राज्यात राबवण्यात येत असलेल्या निधी संकलन मोहीमेवरून शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विरोधकांना लक्ष्य केले. भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

‘सत्ता पडण्याची वाट पाहणारे हँग झाले’

महाविकासाघाडीचे सरकार पडण्याची वाट पाहणारे हँग झाले आहेत. गेल्या 16 महिन्यांपासून सरकार आहे तिथेच आहे, असे सांगत अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना लक्ष्य केले. माझं नाव सत्तार आहे, मी सत्तेतच राहणार, अशी शाब्दिक कोटीही त्यांनी केली. तसेच आगामी काळात ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

संबंधित बातम्या:

भाजपनं प्रभू रामाची मूर्ती उभारली, शिवसेना नेत्या म्हणतात यांनी तर सीतेला वेगळं केलं!

मालवणीत भाजपाने लावलेले प्रभू रामाचे पोस्टर्स पोलीसांनी फाडल्याचा आरोप, प्रकरण चिघळणार?

उद्धव ठाकरे हा दानशूर व्यक्ती, तुमच्यासारखा भिकारी नाही; अब्दुल सत्तारांचा भाजपवर घणाघात

(BJP MLA Ram Kadam slams Shivsena leader Abdul sattar)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.