“विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू”; शिवसेनेच्या नेत्यानं निवडणुकीतील विश्वास बोलून दाखवला
कसाब पोटनिवडणुकीत पैसे वाटप झाल्याच्या आरोपाबद्दल बोलताना उदय सामंत यांनी विरोधकांचा पराभव समोर दिसत असल्याने त्यांच्याकडून हाआरोप केला जात असल्याचा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

मुंबईः दिल्लीचे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीगाठीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्या या भेटीनंतर राज्यातील राजकारणात काही फरक होणार का किंवा केजरीवाल यांच्या भेटीचा आगामी निवडणुकीवर काही परिणाम होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे या भेटीचं विश्लेषण करताना मंत्री उदय सामंत यांनी मात्र या भेटीगाठीचा कोणताही फरक राज्याच्या राजकारणावर होणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
त्याच बरोबर हे आपला महाराष्ट्रात कोणाची ना कोणाची गरज आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटालाही कोणाची तरी गरज असल्यामुळेच त्यांनी या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केल्याची टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवा यांची भेट झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्या भेटीगाठी झाल्या असल्या तरी महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांच्या मताला किंमत शून्य असल्याची टीका त्यांनी केली आहे.
आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकीचा विचार करताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, आता ठाकरे गटाला कुणाची ना कुणाच्या आधाराची गरज आहे.
तर दुसरीकडे आपला महाराष्ट्रात शून्य किंमत असल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळी 45 खासदार निवडून येतील तर विधानसभेच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त जागांवर आम्ही विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कसाब पोटनिवडणुकीत पैसे वाटप झाल्याच्या आरोपाबद्दल बोलताना उदय सामंत यांनी विरोधकांचा पराभव समोर दिसत असल्याने त्यांच्याकडून हाआरोप केला जात असल्याचा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.