Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somayya: मढमधील स्टुडिओत 1 हजार कोटींचा घोटाळा; आदित्य ठाकरे, अस्लम शेखांची दादागिरी; नोटीस देऊनही बांधकाम

किरीट सोमय्या यांनी मढमधील स्टुडिओ बांधकाम प्रकरणी महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि आदित्य ठाकरे मंत्री व अस्लम शेख मंत्री असताना दादागिरी करुन त्यांनी 1 हजार कोटींचा घोटाळा केला असल्याची आरोप करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर व प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही जोरदार हल्ला बोल केला आहे.

Kirit Somayya: मढमधील स्टुडिओत 1 हजार कोटींचा घोटाळा; आदित्य ठाकरे, अस्लम शेखांची दादागिरी; नोटीस देऊनही बांधकाम
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 2:21 PM

मुंबईः मढमधील स्टुडिओ बांधकामामध्ये (Madh Shooting Studeo) आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या दादागिरीमुळे 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील नेते आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले जात आहे. पर्यावरण कायद्यानुसार परवानगीशिवाय मढसारख्या परिसरात बांधकाम करु शकत नाही, तरीही आदित्य ठाकरे (Shivsena MLA Aditya Thackeray), अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी प्रशासनाचा वापर करुन आणि दादागिरी करुन बांधकाम करुन 1 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी बांधकाम पाडण्यासाठी नोटीस देऊन एक महिन्याचा कालावधी लोटून गेल्यानंतर बेकायदेशीर बांधकाम काढण्यात आले नाही त्यामुळे जिल्हाधिकारी, महानगरपालिकेच्या आयुक्त, पर्यावरण खात्यातील अधिकाऱ्यांना नोटीस देणार असल्याचा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.

ठाकरे आणि खान यांचा 1 हजार कोटीचा घोटाळा

किरीट सोमय्या यांनी मढमधील स्टुडिओ बांधकाम प्रकरणी महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि आदित्य ठाकरे मंत्री व अस्लम शेख मंत्री असताना दादागिरी करुन त्यांनी 1 हजार कोटींचा घोटाळा केला असल्याची आरोप करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर व प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही जोरदार हल्ला बोल केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पर्यावरण कायद्यात परवानगी नाही

पर्यावरण कायद्यानुसार कोणत्याही गोष्टीला मढसारख्या भागात बांधकाम करत असताना परवानगी नसताना आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख या दोघांकडून पदाचा आणि प्रशासनाचा वापर करुन या भागात बांधकाम करण्यात आले, त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

ठाकरे, शेखनी दिली होती भेट

मढ परिसराला महाविकास आघाडीचे सरकार असतान 2021 मध्ये आदित्य ठाकरे आणि अस्लम खान यांनी या जागेला भेट दिली होती असाही आरोप करण्यात आला आहे. तेव्हापासून मढ परिसरातील स्टुडिओ बांधकामात घोटाळा झाला असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

स्टुडिओ मालकांवर कारवाई करा

किरीट सोमय्या यांनी यावेळी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि अस्लम खान यांच्यावर दादागिरीचा आरोप करण्यात आला असून या दोघांनी मिळून 1 हजार कोटीचा घोटाळा केला असल्याची आरोप करण्यात आला आहे. या  परिसरातील बेकायदेशीर बांधकामप्रकरणी नोटीस देऊन आणि एक महिना होऊनही बांधकाम काढले गेले नाही त्यामुळे आता अशी प्रकरणे चालणार नाहीत, कारण आता महाविकास आघाडीचे सरकार नाही ते भ्रष्टाचार करत होते तर आता मात्र थेट स्टुडिओच्या मालकांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.