सावरकरांच्या मुद्यावर युती झाली नाही, मात्र आमच्यात कोणता वादही नाही, या पक्षानं स्पष्टच सांगितलं
संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे की, युतीच्या संघर्षाचा आता मुद्दा नाही, आमची नवीन युती असल्याचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईः महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं सगळीच बदलून गेली आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात होणारे बदल आणि त्यावरून ठाकरे गटावरही भाजप आणि हिंदुत्ववादी गटाकडून निशाणा साधला जात आहे. त्यातच भीमशक्ती आणि शिवशक्तीचा नारा दिल्याने भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता.
त्यानंत आता संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाच्या युतीची चिन्हं दिल्यानंतर विरोधकांकडून सावरकरांचा मुद्दा पुढं करण्यात आला.
त्यावरून आता संभाजी ब्रिगेडने आपली भूमिका स्पष्ट करत शिवसेना आणि आमची युती ही राजकीय युती असल्याचे सांगत सावरकरांच्या मुद्यावर युती झाली नाही असंही प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सावरकरांच्या माफीनाम्याचा विषय थेट हा शिवाजी महाराजां यांच्याबरोबर जोडला होता. त्यामुळे त्यावरूनही भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता.
त्यानंतर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्याची चर्चा केली. त्यावरूनही काँग्रेस आणि शिवसेनेला टार्गेट करण्यात आले.
आता शिवसेना काय भूमिका घेणार असा सवाल भाजपकडूनही करण्यात आला होता. त्यानंतर आता संभाजी ब्रिगेडवरही आता सावरकर यांच्या मुद्यावरून लक्ष्य केले जात आहे.
संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत सावरकर यांच्या मुद्यावर सगळीकडे चर्चा होत असतानाच सावरकर यांच्या मुद्द्यावर युती झाली नाही असं स्पष्ट करण्यात आले आहे.
यावरून संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे की, युतीच्या संघर्षाचा आता मुद्दा नाही, आमची नवीन युती असल्याचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी स्पष्ट केले आहे.
भास्करराव जाधव यांच्या सावरकर यांच्या मताविषयी बोलताना गंगाधर बनबरे यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये सगळ्यांना मतं मांडण्याचा अधिकार आहे.
मात्र त्यांनी मांडलेली मतं ग्राह्य धरलीच पाहिजे असा आग्रह नको आहे असं सांगत त्यांनी भास्करराव जाधवांना त्यांनी टोला लगावला आहे. असं असलं तरी या मुद्यावरून आमच्यात कोणताही वाद नाही आणि युतीही तुटणार नाही अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.