“संजय राऊत यांच्या आरोपाची आज भांडाफोड झाली”; शिवसेनेच्या नेत्यानं राऊतांची पोलखोलच केली
ज्यावेळी पोलीस त्यांच्याकडे चौकशीला गेले होते. त्यावेळी त्यांनी मी दमलो असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर चौकशीला गेलेल्या पोलिसांना माहिती देताना त्यांनी घुमजाव केल्याचा ठपकाही त्यांनी त्यांच्यावर ठेवला आहे.
मुंबईः ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल मुख्यमंत्री सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला होता. त्यावरून राजकारण तापलेले असतानाच शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मात्र संजय राऊत यांच्या आरोपाची आज भांडाफोड झाल्याची टीका केली आहे. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून राऊत यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.
त्यामुळे आपल्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी आणि केवळ टीका करायची आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलायचं व प्रसिध्दीच्या झोतात राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असल्याची टीका त्यांनी केली आहे.
त्याचमुळ आम्ही म्हणतो त्यांच डोकं फिरलंय असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत आहेत.
त्यांच्यामाध्यमातून आपण चर्चेत राहण्यासाठी ही टीका केली जात असल्याचा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांना वाटेल तसे आरोप ते मुख्यमंत्र्यांवर करत आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची गरज आहे असल्याचे म्हणत आहोत.
त्यांनी काल खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याप्रकरणी त्यांनी ठाणे पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडेही तक्रार केली आहे.
मात्र ज्यावेळी पोलीस त्यांच्याकडे चौकशीला गेले होते. त्यावेळी त्यांनी मी दमलो असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर चौकशीला गेलेल्या पोलिसांना माहिती देताना त्यांनी घुमजाव केल्याचा ठपकाही त्यांनी त्यांच्यावर ठेवला आहे.
खासदार संजय राऊत यांच्या कालच्या या प्रकारामुळे त्यांच्यावर अर्धातासात गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण गेल्या काही दिवसांपासून सकाळी उठून काही बोलायचं, आरोप करायचे एवढचं त्यांचे काम चालू असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार गेल्यापासून त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे ते चलबिचल झाले आहे. त्यामुळे आपली सुरक्षा वाढवण्यात यावी यासाठी त्यानी थेट खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला असल्याचा ठपका त्यांनी त्यांच्यावर ठेवला आहे.