Maharashtra Election 2024 : अंधेरी पूर्वेतून Rutuja Latke यांनाच उमेदवारी, प्रमोद सावंत यांचा पत्ता कट

Andheri East Assembly Elections 2024 Rutuja Latke : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक प्रमोद सावंत हे इच्छुक होते. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार ऋतुजा लटेक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Maharashtra Election 2024 : अंधेरी पूर्वेतून Rutuja Latke यांनाच उमेदवारी, प्रमोद सावंत यांचा पत्ता कट
rutuja latke shiv sena ubt group
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 8:01 PM

आगामी विधानसभा निवडणूक 2024 साठी वंचित, भाजप, मनसे, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात उबाठा गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उबाठाच्या या पहिल्या यादीत एकूण 65 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. उबाठा गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार असलेल्या ऋतुजा लटके यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. माजी नगरसेवक आणि अंधेरी पूर्व विधानसभा संघटक प्रमोद सावंत हे या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छूक होते. मात्र पक्षश्रेष्टींनी ऋतुजा लटके यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे प्रमोद सावंत यांचा पत्ता कट झाला आहे.

अंधेरी पूर्वेतून प्रमोद सावंत यांचंही नाव चर्चेत होतं. प्रमोद सावंत हे आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. प्रमोद सावंत यांनाच उमेदवारी मिळणार, अशी कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वातावरणनिर्मिती केली होती. मात्र ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळाल्याने ही वातावरणनिर्मिती व्यर्थ ठरली आहे.

2 वर्षांनी पुन्हा मतदान

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना 2 वर्षांनी पुन्हा एकदा मतदान करण्याची संधी मिळणार आहे. याआधी ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली होती. तेव्हा 3 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान झालं होतं. या निवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा विजय झाला होता.

ठाकरे गटाची पहिली यादी, कुणाला उमेदवारी?

ऋतुजा लटके यांच्यासमोर कुणाचं आव्हान?

महायुतीत अंधेरी पूर्व या जागेसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल हे या मतरदारसंघातून इच्छूक आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या आग्रही आहेत. मात्र आता ही जागा महायुतीतील कोणत्या पक्षाकडे जाते? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. तर मनसेकडून रोहन सावंत यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, तिढा कायम?

दरम्यान अनेक चर्चांनंतर अखेर मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस, शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तिन्ही पक्षांचं प्रत्येकी 85 जागावंर सहमत झालं आहे. मात्र याची एकूण बेरीज ही 255 होते. तर 18 जागा या मित्रपक्षाला देण्यात येणार असल्याचं ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे उर्वरित जांगासाठी आघाडीत चर्चा सुरुच राहिल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.