जिद्दीला पेटलेल्या नारायण राणेंना हरवलं, ‘मातोश्री’वर विजयाचा गुलाल, कोण आहेत तृप्ती सावंत?

| Updated on: Apr 06, 2021 | 7:42 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं 'मातोश्री ' निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व (Bandra East) या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व तृप्ती सावंत यांनी केलं होतं.

जिद्दीला पेटलेल्या नारायण राणेंना हरवलं, मातोश्रीवर विजयाचा गुलाल, कोण आहेत तृप्ती सावंत?
Trupti Sawant
Follow us on

मुंबई : शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत (Trupti Sawant) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं ‘मातोश्री ‘ निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व (Bandra East) या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व तृप्ती सावंत यांनी केलं होतं. त्याच तृप्ती सावंत यांनी पक्ष सोडणं हा शिवसेनेला मोठा धक्का आहे. एकीकडे शिवसेना वाढीसाठी राज्यभरातील शिवसैनिक काम करत असताना, खुद्द उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या अंगणातील माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करतो, हा पक्षातील नेत्यांसाठी धक्का आहे.  (Shiv Senas ex MLA Trupti Sawant fought against Narayan Rane in Bandra east bypoll 2015 now joins BJP)

महाराष्ट्रात 2014 ची विधानसभा निवडणूक जेव्हढी गाजली होती, त्यापेक्षा जास्त 2015 मधील वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक गाजली होती. शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार बाळा सावंत यांचं निधन झालं होतं. त्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. त्यावेळी शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती.

नारायण राणेंना फाईट

2015 च्या निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्याविरोधात काँग्रेसकडून नारायण राणे रिंगणात उतरले. थेट मातोश्रीला चॅलेंज देण्यासाठी नारायण राणे यांनी शड्डू ठोकला होता. आधी एकतर्फी वाटणारी आणि सहानुभूतीच्या लाटेवर असणारी ही निवडणूक, चांगलीच चुरशीची झाली. मातोश्रीच्या अंगणात नारायण राणेंनी थेट उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे शिवसैनिकांसाठी ही निवडणूक स्वाभिमानाची होती.

तृप्ती सावंतांचा विजय

या निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी जवळपास 20 हजारांच्या फरकाने नारायण राणेंचा पराभव केला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी जल्लोष करताना हद्द पार केली होती. हातात कोंबड्या घेऊन राणेंविरोधात घोषणा दिल्या जात होत्या.

नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

दरम्यान, नारायण राणे यांच्याविरुद्ध काँट के टक्कर दिल्यानंतर तृप्ती सावंत यांनी आज भाजप आमदार नितेश राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं.

तृप्ती सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश

म्हणून मी भाजपमध्ये – तृप्ती सावंत

बाळा सावंतांच्या निष्ठावंत शिवसैनिकांवर झालेला अन्यायामुळे बंडखोरी केली होती. त्या मतांच्या विश्वासामुळेच मी भाजप प्रवेश केलाय, अशी भूमिका तृप्ती सावंत यांनी मांडली.

कोण आहेत तृप्ती सावंत? 

– तृप्ती सावंत या शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत

– बाळा सावंत यांच्या निधनाने, 2015 च्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांना उमेदवारी

– शिवसेनेकडून लढताना तृप्ती सावंत यांच्याकडून नारायण राणेंचा पराभव

– 2019 च्या निवडणुकीत तृप्ती सावंत यांना डावलून विश्वनाथ महाडेश्वरांना उमेदवारी

– मात्र 2019 मध्ये तृप्ती सावंत यांच्याकडून बंडखोरी करत निवडणूक लढवली

– या निवडणुकीत ना शिवसेनेचा विजय, ना तृप्ती सावंतांचा,

– काँग्रेसच्या झिशान सिद्दिकींनी बाजी मारली

संबंधित बातम्या  

‘मातोश्री’च्या अंगणात शिवसेनेला जबर धक्का, माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

बाळा सावंत घरचा माणूस, भावनिक नातं तोडू नका, उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतरही तृप्ती सावंत बंडखोरीवर ठाम

वांद्र्यात तृप्ती सावंतांकडून पादचारी पुलाचं भूमिपूजन, श्रेयवादावरुन समर्थक आक्रमक