Electric Bus : आजपासून एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ धावणार, लालपरीचं अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण

पुण्यात बुधवारी, 1 जून रोजी होणाऱ्या लोकार्पण सोहोळ्यानंतर ही पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी आज दिली. या सोहळ्याला सर्व एसटी प्रेमी तसेच सर्वसामान्य नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही परब यांनी केले आहे.

Electric Bus : आजपासून एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस 'शिवाई' धावणार, लालपरीचं अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण
शिवाई इलेक्ट्रिक बसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 6:09 AM

मुंबई : वातावरणातील प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने वाहन क्षेत्रातील सर्वाधिक मोठा सार्वजनिक उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवरकच पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक बस (Electric Bus) दाखल होणार आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी बिरूदावली मिरवणारी ‘लालपरी’ अर्थात एसटी आज (1 जून 2022) अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलंय. या दिनाचे औचित्य साधत एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या ‘शिवाई’ या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुण्यात होणाऱ्या लोकार्पण सोहोळ्यानंतर ही पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी दिली होती. या सोहळ्याला सर्व एसटी प्रेमी तसेच सर्वसामान्य नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही परब यांनी केले आहे.

1 जून, 1948 रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती. या घटनेच्या सन्मानार्थ एसटी महामंडळाच्यावतीने दरवर्षी 1 जून रोजी एसटीचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपली एसटी सुद्धा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे, हा एक दुग्धशर्करेचा योग आहे, अशा शब्दात परब यांनी आनंद व्यक्त केला. 1 जून 1948 रोजी एसटीची पहिली बस पुणे-अहमदनगर-पुणे अशी धावली होती. त्यापार्श्वभूमिवर बुधवारी, पुणे येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘शिवाई’चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर ही बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावेल. याशिवाय विद्युत प्रभारक केंद्राचेही उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, अहमदनगर येथूनही शिवाई बस सुटणार आहे. ही बस पुण्यापर्यंत धावेल. 1 जून 1948 रोजी अहमदनगर येथून धावलेल्या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे, असेही परब यांनी सांगितले.

बालगंधर्व सभागृहात मुख्य कार्यक्रम होणार

शिवाईच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यानिमित्त शिवाजीनगर येथील बालगंधर्व सभागृहात मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमादरम्यानउद्धव ठाकरे हे दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत, असेही ॲड. परब यांनी सांगितले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, परिहवन राज्यमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ तसेच परिवहन आणि बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा

‘शिवाई’च्या पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर दिवसाला 6 फेऱ्या होणार

दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर, वाहनांमुळे वाढणारे प्रदुषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात विद्युत प्रणालीवर धावणारी इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेतला, असे मंत्री, ॲड. परब यांनी सांगितले. लोकार्पण केल्यानंतर ‘शिवाई’च्या पुणे – अहमदनगर – पुणे मार्गावर दिवसाला 6 फेऱ्या होणार आहेत. यानंतर टप्प्याटप्याने इलेक्ट्रिक बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असे सांगतानाच आकर्षक रंगसंगती तसेच किफायतशीर व आरामदायी प्रवासामुळे ही बस प्रवाशांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला आहे.

25 वर्षे विना अपघात सेवा करणाऱ्या चालकांचा सत्कार

अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत 25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी विना अपघात सेवा देऊन प्रवाशांना सुखरूप त्यांच्या इच्छितस्थळी नेऊन सोडणाऱ्या चालकांच्या पाठिवर कौतुकाची थाप दिली जाणार आहे. अशी अपघात विरहीत सेवा देणाऱ्या 30 चालकांचा सपत्नीक विशेष गौरव केला जाणार आहे, अशी माहितीही मंत्री, ॲड. अनिल परब यांनी दिली.

‘शिवाई’ची वैशिष्ट्ये

>> बसची लांबी 12 मीटर >> टू बाय टू आसन व्यवस्था >> एकूण 43 आसने >> ध्वनी व प्रदुषणविरहीत तसेच वातानुकूलीत गाडी >> गाडी ताशी 80 किमी वेगाने धावणार >> बॅटरी क्षमता 322 के.व्ही.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.