मुंबई : दादरमधील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानाला यापुढे छत्रपती शिवाजी महाराज मैदान म्हणून ओळखलं जाणार आहे. नुकतंच मुंबई महापालिकेकडून या मैदानाला अधिकृत पाटी लावण्यात आली आहे. या मैदानाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मार्चमध्ये महापालिका सभेत मंजूर करण्यात आला होता. (Shivaji Park Ground Name Plate Change)
मुंबईतील दादरची ओळख असणाऱ्या शिवाजी पार्क मैदानाचं नाव बदलण्यात आलं आहे. शिवाजी पार्क मैदानाचं नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं करण्यात आलं आहे. या नामविस्ताराचा प्रस्ताव मार्चमध्ये महापालिका सभेत मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे तब्बल 73 वर्षांनी शिवाजी पार्क या मैदानाचे नाव बदलण्यात आलं आहे.
दादरमधील शिवाजी पार्क मैदानाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. या मैदानात अनेक राजकीय सभा पार पडतात. विशेष म्हणजे हे मैदान क्रिकेटसाठीही प्रसिद्ध आहे. या मैदानात अनेक क्रिकेटपटू घडले आहेत.
मूळ माहीम पार्क अशी ओळख असणाऱ्या या उद्यानाचे 10 मे 1927 रोजी शिवाजी पार्क असं नामकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर 1966 मध्ये या मैदानात लोकवर्गणीतून शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता.
महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मार्चमध्ये महासभेत या मैदानाचा नामविस्तार करण्याचा ठराव मांडला होता. या प्रस्तावाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी या ठरावाला मंजूरी दिली.
अखेर आज पालिकेने शिवाजी पार्क मैदानाच्या नावाची पाटी बदलून छत्रपती शिवाजी महाराज मैदान अशी अधिकृत पाटी लावली आहे. (Shivaji Park Ground Name Plate Change)
संबंधित बातम्या :
आता मुंबईकर वाचवणार मुंबईकरांचा जीव, महापालिकेकडून नागरिकांना विशेष प्रशिक्षण