Shivaji Park : शिवाजी पार्क यापुढे स्मृतिस्थळ बनविण्यास मनाई करावी, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या प्रमाणात मुलं खेळत असतात. हे मैदान पहिल्यापासूनच दादरमधील मुलांना खेळण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त मुलांना खेळण्यासाठी हे मैदान उपलब्ध रहावे, इतर कुठल्याही कामाकरीता मैदान उपलब्ध करून देऊ नये अशी सदर याचिकेत मागणी करण्यात आली आहे.

Shivaji Park : शिवाजी पार्क यापुढे स्मृतिस्थळ बनविण्यास मनाई करावी, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
'स्किन टू स्किन टच'चा निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींचा राजीनामा मंजूर
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 12:14 AM

मुंबई : मुंबईची ओळख असलेल्या शिवाजी पार्क (Shivaji Park)वर अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शवणारे तसेच यापुढे स्मृतिस्थळ बनविण्यास मनाई करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका (PIL) शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालया (Mumbai High Court)त दाखल करण्यात आली आहे. ही याचिका शिवाजी पार्क परिसरात तळे रहिवासी प्रकाश बेलवाडे यांनी अॅड. प्रकाश सालसिंगिकर यांच्यामार्फत दाखल केली आहे. सदर याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. दादर येथील प्रसिद्ध असलेले शिवाजी पार्क मैदानावर राजकीय तसेच प्रसिद्ध व्यक्तींच्या स्मारक तथा अंत्यसंस्कारकरीता जागा उपलब्ध करून देणे तसेच त्यांना परवानगी देणे थांबवण्यात यावी. तसेच हे मैदान खेळण्यासाठी असल्यामुळे हे इतर कुठलाही गोष्टींसाठी उपलब्ध करून देण्यात येऊ नये या मागणीसाठी ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. (Shivaji Park should no longer be a memorial, a public interest litigation has been filed in the Mumbai High Court)

हे मैदान फक्त मुलांना खेळण्यासाठी राखीव रहावे

शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या प्रमाणात मुलं खेळत असतात. हे मैदान पहिल्यापासूनच दादरमधील मुलांना खेळण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त मुलांना खेळण्यासाठी हे मैदान उपलब्ध रहावे, इतर कुठल्याही कामाकरीता मैदान उपलब्ध करून देऊ नये अशी सदर याचिकेत मागणी करण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानावर खेळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टी करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करत ही जनहित याचिका उच्च न्यायालयात केली गेली आहे. शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा, मनसेचा गुढी पाढवानिमित्त होणारा मेळावा, 26 जानेवारी अशा कार्यक्रमाला अनुमती देण्यात आली आहे.

खेळाव्यतिरिक्त 30 दिवस इतर कार्यक्रमासाठी वापरण्याच्या न्यायालयाच्या सूचना

शिवाजी पार्क मैदान संदर्भात न्यायालयाच्या सूचना आहेत की, खेळाव्यतिरिक्त 30 दिवस या मैदानाचा इतर कार्यक्रमांसाठी वापर होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, नौदल दिन, 1 मे महाराष्ट्र दिवस व 26 जानेवारी हे दिवस वगळून इतर दिवशी हे मैदान खेळण्यासाठी वापरले जाईल. या 30 दिवसांमध्ये दसरा मेळावा, मनसेचा गुढी पाडव्यानिमित्त होणारा मेळावा यांचाही समावेश करण्यात आला. एखादा शासकीय कार्यक्रम मैदानावर घ्यायचा असल्यास तो विशेष अधिकारात घेण्याची तरतूद आहे. (Shivaji Park should no longer be a memorial, a public interest litigation has been filed in the Mumbai High Court)

इतर बातम्या

Kalyan Crime : कल्याणमध्ये पुन्हा एकदा हत्यार तस्कराकडून गोळीबार, हत्यार विक्रीसाठी आला होता आरोपी

Ahmednagar Crime : तब्बल 11 वर्षांनी खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अटक, अहमदनगर गुन्हे शाखेची कारवाई

चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.