बाबुलनाथ मंदिराच्या शिवलिंगाला तडे, आयआयटीचे तज्ज्ञ करणार तपास

मुंबईतील मलबार हील परिसरातील बाबूलनाथाच्या मंदिरातील शंकराच्या पिंढीला तडे गेल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

बाबुलनाथ मंदिराच्या शिवलिंगाला तडे, आयआयटीचे तज्ज्ञ करणार तपास
BABULNATHImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 1:39 PM

मुंबई : मुंबईतील पुरातन जागृत देवस्थान असलेल्या बाबुलनाथ मंदिरातील शंकराच्या पिंढीला तडा गेल्याने भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मंदिराच्या ट्रस्टने पवई आयआयटीच्या तज्ज्ञांना पाचारण केले असून त्यांच्या सल्ल्यानंतर मंदिरात भक्तांकडून घालण्यात येणाऱ्या दूग्ध अभिषेकासह अन्य गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहे. मुंबईतील मलबार हील परिसरातील बाबूलनाथाचे मंदिर १८ व्या शतकातील मानले जाते.

मुंबईतील मलबार हील परिसरातील बाबूलनाथाचे मंदिर १८ व्या शतकातील मानले जात आहे. हे मंदिर १७८० मध्ये बांधून तयार करण्यात होते. तर मंदिरातील शिवलिंग १२ व्या शतकातील आहे. बाबुलनाथाचे मंदिर साडे तीनशे वर्षे जुने आहे. या मंदिरातील शंकराची पिंढ बाभुळाच्या झाडाखाली सापडल्याने त्याचे नाव बाबुलनाथ पडल्याचे सांगितले जात आहे. या मंदिरात भक्त मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे भगवान शंकराच्या पिंढीवर मोठ्या प्रमाणावर भक्तांकडून दुग्धाभिषेक, दही, तूप, भस्म, हळद सारख्या वस्तूंनी सातत्याने अभिषेक होत असतो. त्यातून या पिढींला तडा गेल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मंदिराच्या ट्रस्टने त्यामुळे सध्या केवळ दर्शनाला परवागी दिली असून इतर पिंढीवर अभिषेक करण्यास मनाई केली आहे. आता पिंढीवर केवळ पाण्याने अभिषेक करण्यासाढी परवानगी दिली आहे तसेच फुल आणि फळे अर्पण करण्यासाठी परवानगी दिली आहे.

डिसेंबर महिन्यात उघडकीस आले

बाबुळनाथाच्या पिंढीला तडा गेल्याचे वृत्त गेल्यावर्षी प्रथम डिसेंबर महिन्यात उघडकीस आहे. त्यानंतर मंदिराच्या ट्रस्टने तातडीने पवई आयआयटीच्या तज्ज्ञांना पाचारण केले. या संदर्भात ट्रस्टने आयआयटीला कारण शोधण्यास सांगितले. आयआयटीने दिलेल्या प्राथिमिक अहवालानूसार या पिढीवर सातत्याने दूध आणि इतर पदार्थांच्या अभिषेकाने रासायनिक क्रिया घडून त्यास तडे गेले असावेत असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

अंतिम अहवाल मार्चपर्यंत येणार 

बाबुलनाथ मंदिराचे ट्रस्टी नितीन ठक्कर यांनी मात्र शिवलींगाला तडे गेल्याचे मान्य केलेले नाही. नितीन ठक्कर यांनी पवई आयआयटी तज्ज्ञांचा अंतिम अहवाल मार्चपर्यंत येणार असल्याचे म्हटले आहे. परंतू त्यांनी दिलेल्या सल्ल्यानूसार सध्या अभिषेक थांबविल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शिवलिंगावर दुग्धाभिषेक आणि इतर गोष्टींवर घातलेल्या बंदीने भक्तांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.