“…आता हळूहळू यांचा जय महाराष्ट्र होऊन जाईल”; निकालावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना मोडीत काढलं

| Updated on: May 11, 2023 | 9:35 PM

उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबरोबर चर्चा झाली असली तरी पंतप्रधान मोदींना कोणीही हरवू शकत नाहीत असा विश्वासही त्यांनी भाजपबद्दल बोलून दाखवला आहे.

...आता हळूहळू यांचा जय महाराष्ट्र होऊन जाईल; निकालावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना मोडीत काढलं
Follow us on

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकावंर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे आता न्यायालयाच्या निकालानंतर आता सत्ताधाऱ्यांना बळ मिळाला असल्याने शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
विरोधकांवर टीका करताना भरत गोगावले यांनी टीका करताना विरोधकांचे आता थोबडे काळे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना आता कुठेच बोलायला वाव नाही असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

भरत गोगावले यांनी टीका करताना विरोधकांवर सडकून टीका केली आहे. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर विरोधकांना धक्का बसला असल्याचे सांगितले.

या निकालामुळे आता विरोधकांचे थोबडे काळे झालेले आहेत. विरोधकांना जे-जे काय अपेक्षित होतं ते घडलेलं नाही त्यामुळे ते आता कायम नाराज राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हा निकाल लागण्याआधीपासूनच आम्हाला आमच्या निर्णयावर आणि न्यायालयावर विश्वास असल्याचे सांगत या निर्णयाबाबत आम्हाला अडचण येणार नाही हे आम्ही आधीच सांगितलं होतं त्यामुळे आम्ही समाधानी आहोत, आनंदीत आहोत असंही त्यांनी या निर्णयावर बोलताना सांगितले.

भरत गोगावले यांनी टीका करताना त्यांनी संजय राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. जे रोज सकाळी उठून चर्चा करत होते, की सरकार पडेल, निकाल आमच्या बाजूने लागेल, त्यांची तोंडं आता बंद झालेली आहेत. त्यामुळे उद्यापासून हे काही बोलणार नाही कारण त्यांचं भविष्य खोटं ठरलेलं आहे.

त्यांचा पोपट उडून गेलेला आहे असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तर विरोधकांकडून नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली जाते, तसेच विरोधकांनी आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी नवी मोट बांधली असल्याचे सांगत त्यांनी नितिश कुणार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

नितिश कुमार यांनी सर्वांना एकत्र घेतले आहे, त्यांनी फक्त पंतप्रधान पदी मोदी नको यासाठी ते एकत्र आलेले आहेत मात्र तसं काय होणार नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

विरोधकांनी नितिश कुमार यांना घेऊन मोट बांधली असल्यामुळे विरोधकांसह सगळ्यांना वाटतं की नितिश कुमार आले म्हणजे काहीतरी चमत्कार घडेल पण चमत्कार घडणार नाही त्यांना परत जावे लागणार आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबरोबर चर्चा झाली असली तरी पंतप्रधान मोदींना कोणीही हरवू शकत नाहीत असा विश्वासही त्यांनी भाजपबद्दल बोलून दाखवला आहे.

वज्रमूठ सभेवरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ही सभा हळूहळू खि्ळखिळी झाली आहे त्यातच महाविकास आघाडीमध्येच मतभेद चालू आहे. त्यामुळे त्यांची वज्रमूठ आता खिळखिळी झाली आहे असा टोला त्यांनी मविआला लगावला आहे.