मुंबईतील राजकारण तापणार; ‘त्या’ मुद्द्यावरुन शिवसेना-काँग्रेस आमनेसामने

काँग्रेसकडून पालिकेच्या या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला आहे. | BMC

मुंबईतील राजकारण तापणार; 'त्या' मुद्द्यावरुन शिवसेना-काँग्रेस आमनेसामने
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 7:07 PM

मुंबई: शहरात महापालिकेव्यतिरिक्त विविध प्राधिकरणे आहेत. या प्राधिकरणांमार्फत लोक उपयोगी योजना आणि विकासकामे राबवली जातात. या सर्व प्राधिकरणांना स्वतंत्र अधिकार आहेत. पण ही सर्व प्राधिकरणे वेगवेगळी  न ठेवता मुंबई महापालिका एक प्राधिकरण ठेवण्यात यावे, अशी मागणी पालिका राज्य सरकारला करणार आहे. मात्र, काँग्रेसकडून (Congress) पालिकेच्या या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला आहे. शिवसेनेला ही सर्व प्राधिकरणे ही पालिकेमार्फत आपल्याकडे ठेवायची आहेत, असा आरोप काँग्रेसने केला. (Mumbai and congress conflict in BMC)

मुंबईत म्हाडा, एमएमआरडीए, एमआयडीसी, एसआरए, बीपीटी अशी अनेक प्राधिकरणे आहेत. मात्र, त्याऐवजी मुंबईत महापालिका हे एकच प्राधिकरण नियुक्त करावे, अशी विनंती राज्य सरकारला करण्यात येणार असल्याचे संकेत या अर्थसंकल्पात देण्यात आले आहेत. जेणेकरू एकाच छताखाली वेगवान विकासाची सुविधा देणे आणि इतर प्राधिकरणांच्या ताब्यातील भागात राहणाऱ्या नागरिकांच्या पायाभूत सुविधांबाबतच्या समस्या सोडवणे शक्य होईल, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली होती.

‘सर्व प्राधिकरणं एकत्र करण्याची गरज का?’

मुंबईत असलेल्या विविध प्राधिकरणांच्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना समस्या सोडवताना नागरिकांना त्रास होतो. तसेच या वसाहतींना पालिका पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते, रस्त्यावरील दिवे, घनकचरा व्यवस्थापन सेवा आदी पायाभूत सुविधा पुरवत असते. त्यामुळे पालिके चे आर्थिक नुकसान होत असते. अनेक नियोजन प्राधिकरणे असल्यामुळे तेथील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होणे अशक्य झाले आहे. मुंबईत विकासकामे करताना 16 प्लानिंग एजन्सी आहेत. अनेक एजन्सी असल्या की एक काम करताना अनेक वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात. त्यापेक्षा एक एजन्सी असणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद आदित्य ठाकरे यांनी मांडला.

काँग्रेसची भूमिका काय?

मुंबई महापालिका आणि मुंबईतील सर्व प्राधिकरण ही स्वतंत्रपणे वेगळी कामे करत आहेत. प्रामुख्याने ही प्राधिकरणं तयार झाली ती काही उद्देश ठेऊन, त्यामुळे ती एकत्र करण्याची काही गरज नाही. पालिका आता सर्व प्राधिकरणे एकत्र करू पाहात आहे हे योग्य नाही. काँग्रेसचा या निर्णयाला स्पष्ट विरोध आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

बदलत्या पर्यटन धोरणाची नांदी; राज्याच्या विविध भागात 20 पर्यटन महोत्सवांचे आयोजन

फेरीवाल्यांकडून पैसे उकळणारा नेता काँग्रेसमध्ये असता तर मी थेट कारवाई केली असती: भाई जगताप

(Mumbai and congress conflict in BMC)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.