Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदारांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, पोलिस मात्र रस्त्यावरच

राष्ट्रपती राजवटीनंतरही अनेक आमदार आणि नेते अलिशान जिंदगी जगत आहेत. या आमदारांच्या सुरक्षेसाठी असणारे पोलीस मात्र रस्त्यावरच दिवस काढताना दिसत (Police On political duty) आहेत.

आमदारांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, पोलिस मात्र रस्त्यावरच
Follow us
| Updated on: Nov 14, 2019 | 8:44 AM

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा पेच अद्याप कायम आहे. निवडणुकांचा निकाल लागल्यापासून आतापर्यंत दिवसेंदिवस मुंबईसह राज्यभरातील वातावरण चांगलंच (Police On political duty) तापलं आहे. राष्ट्रपती राजवटीनंतरही अनेक आमदार आणि नेते अलिशान जिंदगी जगत आहेत. तर दुसरीकडे या आमदारांच्या सुरक्षेसाठी असणारे पोलीस मात्र रस्त्यावरच दिवस काढताना दिसत (Police On political duty) आहेत.

एकीकडे आपले आमदार सांभाळण्यासाठी आणि पक्षाच्या बैठकीसाठी दररोज लाखो रुपयांचा चुराडा केला जात आहे. तर दुसरीकडे याच आमदारांच्या सुरक्षेसाठी तसेच जनतेच्या सुरक्षेसाठी बाहेरुन मागवण्यात आलेल्या पोलिसांचे आणि SRPF जवानांचे हाल सुरु आहेत.

सलग 35 किंवा त्याहूनही अधिक तास कर्तव्य बजावूनही या पोलिसांचे खाणे-पिणे तर सोडाच, पण साधं आराम करण्याचीही पुरेशी तजवीज प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. यातच बाहेरून आलेल्या SRPF जवानांना जनावरांच्या कोंदवाड्यासारख अक्षरश: कोंडण्यात आलं (Police On political duty) आहे.

कुर्ला ब्रिजखाली झोपडीवजा असणाऱ्या या खोलीत गाड्यांचा कलकलाट, डासांपासून वाचण्यासाठी अनेक पोलिस शांत झोपल्याचे चित्र ‘टीव्ही 9 मराठी’ च्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. विशेष म्हणजे पोलिस झोपलेले असलेल्या खोली शेजारीच सार्वजनिक शौचालय आहे. त्यामुळे या खोलीत प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. मात्र तरीही दिवसभराचा ताण, थकवा, क्षीण यामुळे पोलिस दलही शांत झोपी गेलं आहे.

राज्यात एकीकडे युतीत असणारे भाजप-शिवसेना मित्रपक्षांचे गणित बिघडले आहे. तर दुसरीकडे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले गेलेले शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत संकेत मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपला एकही आमदार फुटू नये यासाठी त्यांना एकत्रित आणत काळजी घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला शिवसेनेने रंगशारदा तर दुसऱ्या दिवशी द रिट्रीट या अलिशान हॉटेलमध्ये आमदारांची सोय केली.

त्यापाठोपाठ काँग्रेसनेही आपल्या सर्व आमदारांची जयपूरमधील एका अलिशान हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली. एवढंच नाही, तर सत्तास्थापनेच्या हालचालीची प्रत्येक बैठक ही कधी ट्रायडंट, तर कधी ताज लँडसारख्या फाईव्ह स्टार किंवा 7 स्टार हॉटेलमध्ये पार पडत आहे. यामुळे पोलिस प्रशासनाचे मात्र हाल होताना दिसत आहे

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.