आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत, BMC निवडणुकांसाठी शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?

बीएमसी निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करुन जागावाटप जुळवणं कठीण जाईल, असं शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचं मत असल्याची माहिती आहे

आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत, BMC निवडणुकांसाठी शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 10:59 AM

मुंबई : राज्यातील आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा निर्धार वरिष्ठ पातळीवरुन करण्यात आला होता. मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुका शिवसेनेच्या साथीने लढवण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केलं. बीएमसी निवडणुकीत काँग्रेससोबत अधिकृत आघाडी करण्याचा शिवसेनेचाही इरादा नाही. मात्र भाजपचा पाडाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या जागांवर शिवसेना काँग्रेससोबत ‘सामंजस्य करार’ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Shivsena Congress may have understanding alliance for BMC elections)

शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आघाडीबाबत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुकांना काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित ताकदीने सामोरे जाणार असल्याचं सांगितलं होतं. शिवसेना मुंबई महापालिकेतील 227 पैकी दोनशेहून अधिक जागा दशकानुदशकं स्वबळावर लढवत आली आहे. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडीत जुळवून घेणं कठीण जाईल, असं शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचं मत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

“म्हणून काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा”

“मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष नवीन आहेत. त्यामुळे ‘एकला चलो रे’ हा नारा देऊन ते कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावतील. मुंबईच्या काही पट्ट्यांमध्ये काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे तेही 80-100 जागांच्या खाली तडजोड करणार नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मुंबई महापालिका निवडणुकीत  आघाडीत सामावून घेणं सोपं जाणार नाही. आघाडी करुन आम्ही 150 च्या आसपास जागा लढवल्या, तर 114 हा बहुमताचा आकडा स्वबळावर गाठणं आम्हाला कठीण जाईल” असं संबंधित शिवसेना पदाधिकाऱ्याने सांगितल्याची माहिती आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना – 97 भाजप – 83 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी – 8 समाजवादी पक्ष – 6 मनसे – 1 एमआयएम – 1 अभासे – 1

(Shivsena Congress may have understanding alliance for BMC elections)

शिवसेना काँग्रेससोबत ‘मैत्रीपूर्ण लढत’?

“शिवसेना-काँग्रेस 40-50 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करु शकतात. काँग्रेसला 50 जागा मिळाव्यात, याची खातरजमा आम्हाला करावी लागेल, तरच शिवसेना आणि भाजपच्या जागांमध्ये मोठे अंतर असेल. बीएमसी निवडणुकीत बरेचदा विजयाची टक्केवारी 50 टक्क्यांच्या आसपास असते. त्यामुळे आम्हाला 200 आणि काँग्रेसला 100 जागा जिंकणे गरजेचे आहे. काँग्रेसची मतपेटी असलेल्या गरीब आणि अल्पसंख्याक पट्ट्यात आम्ही सामंजस्याने उमेदवार देणार नाही” असे संकेतही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.

“मुस्लिमबहुल मतदारसंघात शिवसेना ते काँग्रेस अशी थेट मतं ट्रान्सफर होणं शक्य नाही, त्यामुळे प्रभागनिहाय सूत्र ठरवावे लागेल. पण आम्ही राष्ट्रवादीसोबत आघाडीचा विचार करु शकतो, कारण त्यांच्याकडून कमी जागांची मागणी होण्याची चिन्हं आहेत.” असंही शिवसेनेतर्फे सांगण्यात आलं. 2022 मध्ये नियोजित मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांनी कंबर कसल्याचं चित्र आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘एकला चलो रे’?

मुंबई महापालिका कुणाची?, जेपी नड्डा येण्याआधीच भाजप-शिवसेनेत रंगलं वाकयुद्ध

(Shivsena Congress may have understanding alliance for BMC elections)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.