प्रविण दरेकरांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नव्हे, शिवसेनेचे दत्ता दळवी शहीद परिवार गौरव समारंभाला उपस्थित

दत्ता दळवी हे प्रविण दरेकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला नव्हे तर शहीद परिवार गौरव समारंभ आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

प्रविण दरेकरांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नव्हे, शिवसेनेचे दत्ता दळवी शहीद परिवार गौरव समारंभाला उपस्थित
दत्ता दळवी
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 5:13 PM

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलेल्या कार्याचा “वर्षभराचा लेखाजोखा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला शिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी हजेरी लावल्याची चर्चा होती. मात्र दत्ता दळवी हे प्रविण दरेकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला नव्हे तर शहीद परिवार गौरव समारंभ आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते.  (Shivsena Datta Dalvi not presented in BJP Pravin Darekar book publication ceremony)

प्रविण दरेकरांनी विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या कार्याचा ”वर्षभराचा लेखाजोखा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. मात्र त्याचवेळी दुसरीकडे शहिदांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रमही सुरु होता. त्या कार्यक्रमाला दत्ता दळवी उपस्थित होते. ते प्रविण दरेकरांच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

मुलुंडच्या कालिदास नाट्यमंदिरात भाजपकडून शहीद परिवार गौरव समारंभ आयोजित केला होता. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि खासदार मनोज कोटक उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते दत्ता दळवी उपस्थित होते.

प्रविण दरेकरांचा पुस्तक प्रकाशन सोहळा

प्रविण दरेकरांनी लिहिलेल्या “वर्षभराचा लेखाजोखा” या पुस्तकाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन झाले. हा कार्यक्रम दक्षिण मुंबईत झाला.  या कार्यक्रमाला भाजप नेते गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार हे भाजपचे प्रमुख नेतेही उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीसांकडून दरेकरांचं  कौतुक

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांची मुक्तकंठाने तारीफ केली. प्रवीण दरेकर यांनी आव्हानात्मक आणि संक्रमणाच्या काळात विरोधी पक्षनेतेपदाची धुरा हातात घेतली. माणसाचा कस हा आव्हानावेळीच लागतो. संघर्षाच्या काळात व्यक्ती कशी वागते, यावर त्याचं नेतृत्त्व जोखलं जातं, असे फडणवीस यांनी म्हटले.

मात्र, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याच्या ओघात केलेल्या काही वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. भाषणं तर अनेक लोक करतात, अनेकांना ती कला चांगली अवगतही आहे. पण मैदानात संघर्षाची वेळ आल्यानंतर घरात लपून बसणारे, मैदानातून पळ काढणारे अनेक नेते आपण पाहिले आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले. आता देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणत्या नेत्यांच्या दिशेने होता, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

‘धारावी पॅटर्न’वरुन मुख्यमंत्र्यांना टोला?

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला असताना आणि लोकं मृत्यमुखी पडत असताना काही लोकं वेगवेगळे पॅटर्न सांगून आपल्या पाठी थोपटून घेत होते. पण समाजात जात नव्हते, समाजाचं दु:ख समजून घेत नव्हते. त्यावेळी अनेकांना रुग्णवाहिका मिळत नव्हती, लोक रस्त्यावर मरुन पडत होते. अशा काळात भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरुन काम केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Shivsena Datta Dalvi Present in BJP Pravin Darekar book publication ceremony)

संबंधित बातम्या : 

भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला आणि बेहरामपाडा म्हटलं की ‘मातोश्री’ला त्रास : आशिष शेलार

आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.